Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘कायदा फक्त आमच्यासाठीच आहे का?’; थाप्याचे केअरटेकर गोविंद येवले यांचा प्रशासनाला थेट सवाल

दसरा उत्सवातील केदारनाथ आणि भैरवनाथ या देवतांची पारंपरिक बंधुभेट यंदाही होऊ शकली नाही. दांडेघर ग्रामस्थांनी पोलीस बंदोबस्तात आपली पालखी लवकर काढून माघारी नेल्याने ही परंपरा खंडित झाली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 25, 2026 | 12:22 PM
'कायदा फक्त आमच्यासाठीच आहे का?'; थाप्याचे केअरटेकर गोविंद येवले यांचा प्रशासनाला थेट सवाल

'कायदा फक्त आमच्यासाठीच आहे का?'; थाप्याचे केअरटेकर गोविंद येवले यांचा प्रशासनाला थेट सवाल

Follow Us
Follow Us:
  • पसरणीचा ऐतिहासिक दसरा उत्सव उत्साहात
  • तक्रारी अर्जांवरूनच एवढी मोठी कारवाई कशी?
  • ग्रामस्थांच्या भावना यांचा विचार न करता थापा सील
पाचगणी : संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला पसरणीचा ऐतिहासिक दसरा उत्सव यंदाही हजारो भाविकांच्या उपस्थितीत पारंपरिक उत्साहात आणि निर्विघ्नपणे पार पडला. मात्र, उत्सवापूर्वी प्रशासनाने थापा सील केल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीने महाबळेश्वरच्या तहसीलदारांच्या कारभारावरच गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. हजारो भाविकांची श्रद्धा, शेकडो वर्षांची परंपरा आणि ग्रामस्थांच्या भावना यांचा विचार न करता थापा सील करण्याची कारवाई नेमकी कोणत्या आधारावर करण्यात आली, असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी संभाव्य वादाचे कारण पुढे करून निर्बंध लादण्यात आले, त्याच ठिकाणी हजारो ग्रामस्थांच्या उपस्थितीत कोणताही मोठा अनुचित प्रकार घडला नाही. मग प्रशासनाच्या कारवाईमागील नेमके कारण काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. थापा सील झाल्याने यंदाचा दसरा उत्सव कसा पार पडणार, याकडे संपूर्ण वाई तालुक्याचे लक्ष लागले होते. मात्र, पसरणीकरांची एकजूट, भाविकांची श्रद्धा आणि परंपरा जपण्याची भूमिका लक्षात घेऊन वाईच्या प्रांताधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेतली. त्यांनी महाबळेश्वरच्या तहसीलदारांना थापा खुला करण्याबाबत निर्देश दिल्यानंतर उत्सवाचा मार्ग मोकळा झाला.

Vasai Virar Water Cut Crisis : वसई-विरारवर 10% पाणीकपातीचे सावट! 8 दिवसांत अहवाल सादर करण्याचे महापौरांचे निर्देश

थाप्याचे मालक वाकडे यांनीही परंपरा अखंडित ठेवण्यासाठी दांडेघर आणि पसरणी ग्रामस्थांना सहकार्य केले. त्यामुळे यंदाचा दसरा उत्सव पार पडला; परंतु प्रशासनाच्या कारवाईने निर्माण केलेले प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत.

बंधुभेटीची परंपरा खंडित; पसरणीच्या तरुणांचा संताप

दसरा उत्सवातील केदारनाथ आणि भैरवनाथ या देवतांची पारंपरिक बंधुभेट यंदाही होऊ शकली नाही. दांडेघर ग्रामस्थांनी पोलीस बंदोबस्तात आपली पालखी लवकर काढून माघारी नेल्याने ही परंपरा खंडित झाली. त्यामुळे पसरणीतील तरुणांमध्ये नाराजी पसरली. संतप्त तरुणांनी काही काळ रस्त्यावर ठिय्या दिल्याने प्रशासनाला त्यांची समजूत काढावी लागली. मात्र, पोलीस प्रशासनाने परिस्थिती अत्यंत संयमाने आणि शांततेने हाताळल्याने कोणताही मोठा वाद निर्माण झाला नाही. एका बाजूला शेकडो वर्षांची धार्मिक परंपरा, तर दुसऱ्या बाजूला प्रशासनाच्या कारवाईतून निर्माण झालेली मर्यादा, अशा कात्रीत यंदा भाविक सापडले. उत्सव पार पडला, मात्र बंधुभेट न झाल्याची खंत पसरणीकरांच्या मनात कायम राहिली.

तक्रारी अर्जांवरूनच एवढी मोठी कारवाई कशी?

थाप्याचे केअरटेकर गोविंद येवले यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतले. ते म्हणाले, “महाबळेश्वरच्या तहसीलदारांनी भविष्यात येथे वाद होऊ शकतात, असे कारण पुढे करून हा पॉईंट सील केला. गेले सहा महिने माझी व माझ्या कामगारांची उपासमार सुरु आहे. पोलिसांकडे करण्यात आलेल्या तक्रारी अर्जांच्या आधारेच एवढी मोठी कारवाई करण्यात आली. मात्र, संभाव्य वादाची शक्यता आणि प्रत्यक्षात घडलेली घटना यांत फरक असतो. हजारो ग्रामस्थ उपस्थित असताना दसऱ्याच्या दिवशी कोणताही मोठा अनुचित प्रकार घडला नाही. मग थापा सील करण्याची वेळ का आली, याचे उत्तर प्रशासनाने द्यायला हवे.”

Web Title: Govind yewale caretaker of thapa poses direct question to administration nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2026 | 12:22 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.