
४७१ गावांमध्ये 'एक गाव, एक गणपती'
गणेशोत्सवात गणपती बाप्पाची कोणत्या रंगाची मूर्ती घरी आणावी? जाणून घ्या
गणपतीच्या मूर्तीसह, गणपतीचे पारंपरिक दागिने, मंडप, कार्यकर्ते आणि दर्शनासाठी येणाऱया भाविकांचा असा एकूण 474 कोटींचा विमा उतरवण्यात आलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जीएसबी मंडळाकडे 67 कोटींचे गणपतीचे दागिने आहेत. त्याचबरोबर 325 किलो चांदीचे दागिने आहे. त्याचबरोबर मंडळाचे कार्यकर्ते, पुजारी, आचारी आणि सुरक्षा रक्षक यांचा तब्बल 375 कोटी रुपयांचा विमा काढण्यात आला आहे.
याशिवाय मंडळाने सामाजिक भान जपत आग प्रतिबंधक आणि भूकंप सारख्या आपत्तीमध्ये हाेणारे नुकसान टाळण्यासाठी 2 कोटी रुपयांचा विमा काढण्यात आला आहे. त्याचबरोबर गणेशोत्सवासाठी बांधण्यात येणारे मंडप आणि दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा 30 कोटी रुपयांचा विमा काढण्यात आला आहे. सोने व चांदीच्या दरात वाढ झाल्याने यंदा दागिन्यांच्या विम्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. तसेच गणरायाच्या मूर्तीचे पुजारी आणि कार्यकर्त्यांचाही यामध्ये समावेश केला आहे, अशी माहिती जीएसबी सेवा मंडळ, किंग्ज सर्कल मंडळाचे अध्यक्ष अमित पै, यांनी दिली आहे.
भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थी विशेष का असते? जाणून घ्या
मागच्या वर्षी मंडळाने 400 कोटींच्या विमा उतरवला होता. सोने व चांदीच्या दरात वाढ झाल्याने यंदा दागिन्यांच्या विम्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. तसेच याआधी म्हणजेच 2023 मध्ये 360.40 कोटी इतका विमा मंडळाने जारी केला होता. जीएसबी गणपती मुंबईतील सर्वात श्रीमंत गणपती मंंडळ असून गणेशोत्सावानिमित्ताने दररोज किमान 20000 इतके भाविक रोज दर्शनासाठी येत असतात, अशी माहितीदेखील मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.
सर्वात श्रीमंत मंडळ
किंग्ज सर्कल येथील गौड सारस्वत ब्राह्मण (GSB) सेवा मंडळ हे शहरातील सर्वात श्रीमंत मंडळ मानले जाते आणि दरवर्षी ते सोन्या-चांदीच्या दागिन्यांनी सजवलेले गणपती अतिशय भव्य पद्धतीने प्रदर्शित करतात. या ठिकाणी 24 तास पूजापाठ आणि अनुष्ठान चालू राहते आणि इतकंच नाही तर बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी तुफान गर्दीही असते. केवळ श्रीमंती नाही तर गौड सारस्वत समाजाची परंपरा जपत या मूर्तीचे पूजन कऱण्यात येते आणि जगातील अनेक GSB यावेळी केवळ बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात आणि याशिवाय रात्रंदिवस येथे बाप्पाच्या दर्शनासाठी रांगाच्या रांगा लागलेल्या दिसून येतात.