Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मलंग गड परिसरात गुटख्याचा कारखाना, गुटखा विक्रीचे कनेक्शन सुरतमध्ये? पोलिसांचा तपास सुरु

गुटख्यासाठी लागणारा कच्चामाल हा सुरतवरून आणण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या कारखान्यासाठी जागा दिली त्या जमीन मालकाचा शोध सुरू असून त्याच्यावर देखील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितलं.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 29, 2024 | 06:32 PM
मलंग गड परिसरात गुटख्याचा कारखाना, गुटखा विक्रीचे कनेक्शन सुरतमध्ये? पोलिसांचा तपास सुरु
Follow Us
Close
Follow Us:

बदलापूर काटइ रोडवर गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या तीन आरोपींना सापळा रचत कल्याण क्राईम ब्रँचने बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून सात लाख रुपये किमतीचा गुटख्याचा साठा देखील जप्त केला आहे. कल्याण क्राईम ब्रँचच्या पथकाचा तपास सुरू असताना हा गुटखा मलंग रोडवर असलेल्या कुशवली गावात एका कारखान्यात बनवला जात असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी या कारखान्यावर देखील छापा टाकला आहे. या ठिकाणी एक शेड खाली सुरू असलेल्या कारखान्यात गुटखा बनवण्याची मशीन, गुटख्याचा साठा कच्चामाल असा तब्बल सतरा लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत करण्यात आला आहे. कल्याण क्राईम ब्रँचने याप्रकरणी विराज आलेमकर यांच्यासह कारागीर मोहम्मद रहमान व मोहम्मद खान या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. विराज हा या आधी देखील गुटख्याची विक्री करत असल्याची माहिती समोर आली आहे. या गुटख्यासाठी लागणारा कच्चामाल हा सुरतवरून आणण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या कारखान्यासाठी जागा दिली त्या जमीन मालकाचा शोध सुरू असून त्याच्यावर देखील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितलं. या रॅकेटमध्ये आणखी काही जणांचा सहभाग असल्याचे संशय पोलिसांना आहे याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.

नक्की प्रकरण काय?

बदलापूर काटई रोडवर गुटख्याची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती कल्याण क्राईम ब्रांचचे अधिकारी संतोष उगलमुगले यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे कल्याण क्राईम ब्रांच पथकाने बदलापूर काटई रोडवर सापळा रचला. एक गाडी संशयास्पद रित्या येताना दिसली असता पोलिसांनी ही गाडी थांबून गाडीचे झडती घेतली. या गाडीमध्ये गुटख्याचा साठा आढळून आला. पोलिसांनी या गाडीतील तीन आरोपींना ताब्यात घेतलं. विराज आलिमकर, मोहम्मद रहमान, मोहम्मद खान अशी या तिघा आरोपींची नावे आहेत. तिघे मुंब्रा येथे राहणारे आहेत. अप्पर पोलीस आयुक्त शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार, पोलीस निरीक्षक राहुल मस्के, संदीप चव्हाण, संतोष उगलमुले, पोलीस कर्मचारी राहुल कामत, गोरक्ष शेकडे, गुरुनाथ जरग यांच्या पथकाने या प्रकरणी तपास सुरू केला. अटक तिघा आरोपींकडे चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. अंबरनाथ तालुक्यातील मलंगड परिसरात कुशवली गावात जंगला शेजारी गुटखा बनवण्याचा कारखाना सुरू होता. कल्याण क्राईम ब्रांचच्या पथकाने तात्काळ कुशवली गावाजवळ धाव घेत या कारखान्यावर छापा टाकला. एका शेड खाली सुरू असलेल्या या कारखान्यात गुटखा बनवण्याची मशीन व गुटख्याचा साठा देखील होता. पोलिसांनी गुटखा बनवण्याची मशीन, गुटखा बनवण्यासाठी लागणारा कच्चामाल, गुटखा वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी गाडी व गुटख्याचा साठा असा तब्बल 17 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

राज निवास या ब्रँडने गुटखा बनवून तो बाजारात विकला जात होता. विराज आलिमकर या आरोपीने हा कारखाना सुरू केला होता तर मोहम्मद रहमान व मोहम्मद खान हे दोघं कारागीर गुटखा बनवण्याचे काम करत होते. विराज या आधी देखील गुटखा विक्रीच्या व्यवसायात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. हा कारखाना कधीपासून सुरू होता, त्यांनी आत्तापर्यंत किती गुटख्याच्या साठ्याची विक्री केली आहे, या कारखान्याचा जमीन मालक कोण आहे? याचा तपास कल्याण क्राईम ब्रांच करत आहे. या रॅकेटमध्ये आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. गुटखा बनवण्यासाठी लागणारा कच्चामाल हा सुरतवरून येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळे गुटखा प्रकरणात सुरत करेक्शन असल्याचे देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. कल्याण क्राईम ब्रांच पथक याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

Web Title: Gutkha factory in malanggad area gutkha sales connection in surat police investigation started ambernath crime case maharashtra police

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 29, 2024 | 06:32 PM

Topics:  

  • Ambernath Crime case
  • kalyan

संबंधित बातम्या

Kalyan : डोंबिवलीत भाजपा आणि ओम गणपती मित्र मंडळातर्फे भव्य दहीहंडी उत्सव
1

Kalyan : डोंबिवलीत भाजपा आणि ओम गणपती मित्र मंडळातर्फे भव्य दहीहंडी उत्सव

KDMC News: कल्याणकरांचा पाणी प्रश्न लवकरच सुटणार! उपमुख्यमंत्र्यांची घेतली भेट
2

KDMC News: कल्याणकरांचा पाणी प्रश्न लवकरच सुटणार! उपमुख्यमंत्र्यांची घेतली भेट

Kalyan Crime news: शिष्टाचार आणि वागणुकीचे मूलभूत येत नसल्याने चार वर्षीय मुलीची हत्या; त्यानंतर गादीत गुंडाळून…
3

Kalyan Crime news: शिष्टाचार आणि वागणुकीचे मूलभूत येत नसल्याने चार वर्षीय मुलीची हत्या; त्यानंतर गादीत गुंडाळून…

Ajit Pawar on Meat ban: १५ ऑगस्टला मांस विक्रीवर बंदी…! अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले श्रद्धेचा प्रश्न असल्यास..
4

Ajit Pawar on Meat ban: १५ ऑगस्टला मांस विक्रीवर बंदी…! अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले श्रद्धेचा प्रश्न असल्यास..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.