अत्याचार करणाऱ्यांना लोकांसमोर फाशी द्या
सातारा : बदलापूर जिल्हा ठाणे येथील चिमुरडीवर अत्याचार करणारा मुख्य आरोपी अक्षय शिंदे यांचा मुंब्रा बायपास येथे पोलिसांनी एन्काऊंटर केला. या एन्काऊंटरनंतर सत्ताधारी महायुती सरकारमधील शिवसेनेसह इतर पक्षांनी या कारवाईचे समर्थन केलं. तर दुसरीकडे विरोधकांनी पोलिसांच्या या कारवाईवर संशय व्यक्त करत टीकेची झोड उठवली. मात्र, भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी या कारवाईचा समर्थन करत विरोधकांना चांगले सुनावलं आहे.
हेदेखील वाचा : धक्कादायक ! ट्रकमध्येच चालकाने घेतला गळफास; दोन दिवसांपासून ट्रक होता पेट्रोलपंपजवळ उभा, संशय आला अन्..
छत्रपती शिवरायांच्या काळात जी न्यायव्यवस्था होती, त्या प्रकारची न्यायव्यवस्था आता असायला हवी. त्यासाठी कायद्यात बदल करावा लागला तरी हरकत नाही. पीडित मुलीच्या कुटुंबाला ज्या परिस्थितीला सामोरे जावे लागते, त्या कुटुंबाच्या जागेवर मी स्वतःला ठेवून बोलत असतो. सत्ताधारी विरोधक मला काही घेणं-देणं नाही. सत्ताधारी असू दे किंवा विरोधक. जे कोणी असू दे त्यांच्या कुटुंबासोबत हा प्रसंग घडला असता तर काय केलं असतं असा खडा सवाल त्यांनी केला.
तसेच बदलापूर प्रकरणातावर ते म्हणाले, ‘अशा गुन्हेगारांना गोळ्या घालून मारणे हे अतिशय सहज झाले. मात्र, या लोकांना जनतेत सोडले पाहिजे आणि जनतेने त्यांना तुडवून मारले पाहिजे. निष्पाप जीवांवर अत्याचार करणाऱ्यांना सरळ लोकांसमोर फाशी दिली पाहिजे,’ अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली.
हेदेखील वाचा : 20 तासांत दुसरा एन्काऊंटर! दोन जवानांची रेल्वेतून फेकून हत्या, एक लाखाचे बक्षीस असलेला आरोपी चकमकीत ठार
ट्रान्झिट रिमांडमध्ये नेत असताना एन्काऊंटर
बदलापूर अत्याचार प्रकरणातील प्रमुख आरोपी अक्षय शिंदे याला ट्रान्झिट रिमांडसाठी नेत असताना अचानकपणे एन्काऊंटर करण्यात आले. पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी त्याच्यावर गोळीबार केल्याचे सांगितले जात आहे. त्यातच आरोपी अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला.