Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 16 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“शरद पवारांसारख्या माणसाला एकच व्यक्ती पुरून उरला तो म्हणजे….”; महायुतीतील नेत्याची पवारांवर बोचरी टीका

  • By युवराज भगत
Updated On: Apr 24, 2024 | 02:43 PM
Devendra Fadnavis and sharad pawar

Devendra Fadnavis and sharad pawar

Follow Us
Follow Us:
Kolhapur Lok Sabha 2024 : लोकसभेची रणधुमाळी सुरू झाली आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. लोकसभेचा प्रचाराचा धुरळा उडू लागला आहे. यामध्येच महायुतीतील एका नेत्याने शरद पवारांवर बोचरी टीका करताना, शरद पवारांसारख्या माणसाला देवेंद्र फडणवीस यांची जात काढावी लागते असे म्हटले आहे. कारण शरद पवारांसारख्या माणसाला एकच व्यक्ती पुरुन उरला आहे तो म्हणजे देवेंद्र फडणवीस. महायुतीतल्या नेत्यानेच हे वक्तव्य केलं आहे. कोल्हापूरमध्ये माध्यमांशी बोलताना सदाभाऊ खोत यांनी हे वक्तव्य केले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभांचा आणि रॅलीजचा धडाकाही सुरु झाला आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत महाराष्ट्रात आहे. महायुतीने ४५ पेक्षा जास्त जागा निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. अशात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडणं हे काही नवीन नाही. रयत क्रांती पक्षाचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची तुलना करीत एकटे फडणवीस पवारांना पुरून उरले आहेत, असे म्हटले आहे.
काय म्हणाले सदाभाऊ खोत?
“७० वर्षांपासून महाराष्ट्रात मूठभर सरदारांचं राज्य होते. या सरदारांना पायाखाली कचाकचा तुडवण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यामुळेच शरद पवारांसारख्या नेत्याला त्यांची जात काढावी लागते. पण, पवार तुमची जात वेगळी असती, तुमचं आडनाव फडणवीस असतं तर महाराष्ट्रात तुम्हाला कुणी हुंगलंही नसतं. मात्र, देवेंद्र फडणवीस हा एकच बाप असा आहे जो शरद पवारांना पुरुन उरला. त्यामुळे या वयातही शरद पवारांना खोटं बोलत रेटून चालावं लागतं आहे.”
पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला मोठं यश
पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला मोठे यश संपादन होईल, असं चित्र निर्माण झाले आहे. पश्चिम महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचाराने मंतरलेला प्रदेश आहे. महापुरुषांचे नाव घेणारी माणसं सध्या वाड्यामध्ये आहेत. आताची लढाई ही वाडा विरुद्ध गावगाडा अशी आहे. या निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून हे सगळे वाडे उध्वस्त होणार आहेत. रयतेचा विजय निश्चितपणे होणार आहे, असे सदाभाऊ खोत यांनी सांगितलं.

Web Title: Harsh criticism of leader of grand alliance only one person left to bury a man like sharad pawar is nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2024 | 02:38 PM

Topics:  

  • BJP Grand Alliance
  • Lok Sabha 2024

संबंधित बातम्या

NDA चे राज्यसभेत वाढतंय संख्याबळ; 163 पर्यंत आकडा पोहोचण्याची शक्यता, आता घटनादुरुस्तीसाठी…
1

NDA चे राज्यसभेत वाढतंय संख्याबळ; 163 पर्यंत आकडा पोहोचण्याची शक्यता, आता घटनादुरुस्तीसाठी…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.