Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चांदोली पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस; तिसऱ्या दिवशीही अतिवृष्टीची नोंद

चांदोली धरणाच्या (Chandoli Dam) पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. पाणलोट क्षेत्रातून १३ हजार ५६१ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. गेल्या २४ तासांत धरणातील पाणी पातळी सव्वा मीटरने तर साठा सव्वा टीएमसीने वाढत आहे. सलग तिसऱ्या दिवशीही अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 07, 2022 | 08:24 PM
चांदोली पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस; तिसऱ्या दिवशीही अतिवृष्टीची नोंद
Follow Us
Close
Follow Us:

शिराळा : चांदोली धरणाच्या (Chandoli Dam) पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. पाणलोट क्षेत्रातून १३ हजार ५६१ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. गेल्या २४ तासांत धरणातील पाणी पातळी सव्वा मीटरने तर साठा सव्वा टीएमसीने वाढत आहे. सलग तिसऱ्या दिवशीही अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

पावसाचा जोर कायम असल्यामुळे येथे अतिवृष्टी होत आहे. धरणातून ७९३ क्युसेक विसर्ग वारणा नदीच्या पात्रात सुरू केला आहे. कोकरूड-रेठरे बंधारा तीन दिवस पाण्याखाली आहे.
धरण सध्या ३९.४६ टक्के भरले आहे. सध्या धरणाची पाणीपातळी ६०१.२५ मीटर झाली असून, पाणीसाठा १३.५८ टीएमसी झाला आहे. एकूण पाऊस ४४३ मिलीमीटर झाला आहे.

सध्या पावसाची संततधार कायम सुरुच आहे. पाणलोट क्षेत्रात तर मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा या ठिकाणी पाऊस कमी असला तरी परिसरात वाराही सोसाट्याचा वाहतो आहे. हवेत कमालीचा गारठा आहे, वीजपुरवठाही वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे, असा इशाराही धरण प्रशासनामार्फत देण्यात आला आहे.

धुव्वाधार पावसामुळे भात रोप लागण करण्याची धांदल सुरू आहे. उभ्या पावसात रोप लागणीची कामे महिला करत आहेत. अद्यापही कधी मुसळधार तर कधी संततधार पाऊस सुरूच आहे.

Web Title: Heavy rain in chandoli dam in shirala nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2022 | 08:24 PM

Topics:  

  • Shirala

संबंधित बातम्या

Shirala Leopard Attack News: शिराळ्यात बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू; वनपरिक्षेत्र अधिकारी निलंबित, विधानसभेत संताप
1

Shirala Leopard Attack News: शिराळ्यात बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू; वनपरिक्षेत्र अधिकारी निलंबित, विधानसभेत संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.