राज्यात गेल्या २ दिवसापासून पाऊस थोडा विश्रांती घेत घेत कोसळत आहे. तरी आजही काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. वर्धा, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, बुलडाणा, यवतमाळ, भंडारा या जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती आहे. तर आज अकोला आणि अमरावतीला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
[read_also content=”नुपूर शर्मांच्या नव्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी https://www.navarashtra.com/latest-news/russia-ukraine-war/ukraines-president-action-on-intelligence-and-judiciary-chiefs-suspended-nrgm-305679.html”]
विदर्भातील (Vidarbha) नागपूरमध्ये रविवारी पावसाने दिवसभर उसंत घेतल्यानंतर त्याच रात्री मात्र शहराला चांगलेच झोडपले होते. मात्र सोमवारी सकाळपासून पुन्हा थोड्या थोड्या वेळाच्या विश्रांतीनगर पावसाची रिपरिप सुरु होती. दरम्यान, महानगरपालिकेने नियोजन केले नसल्याने शहरातील रस्ते जलमय झाले तर अनेक वस्त्यांमध्ये पाणी घुसल्याचं चित्र पाहायला मिळालं. इतर जिल्ह्यांमध्येही आज मुसळधार पावसाचा इशारा आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्धा आणि चंद्रपुरातील पूर परिस्थितीची पाहणी करणार आहेत.
[read_also content=”नुपूर शर्मांच्या नव्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी https://www.navarashtra.com/india/the-supreme-court-will-hear-the-new-petition-of-nupur-sharma-today-305670.html”]