गेल्या आठवड्यात मराठवाडा- पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे अभूतपूर्व नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेलं पीक गेल्याने शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. या अतिवृष्टीमुळे हतबल झालेल्या एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे संभाजीनगरवर शोककळा पसरली आहे.
Maharashtra Rain Alert: यंदा आणा वॉटरप्रूफ पणत्या! कारण पाऊस ऑक्टोबरमध्ये …; चिंता वाढली
छत्रपती संभाजीनगरच्या बकापूर-पळशी या गावात मधुकर सर्जेराव पळसकर यांनी आत्महत्या केली. पळसरकर यांनी गळफास घेत आयुष्याचा शेवट केला. गेल्या आठवड्यात संभाजीनगरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने राज्यातील हजारो शेतकरी कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. यात मधुकर पळसकर यांच्याही शेतीचे प्रचंड नुकसान झाले.
मधुकर पळसकर यांनी मोठ्या मेहनतीने शेतात कोबी पिकाची लागवड केली होती. पीकही चांगलं आलं होतं. पण मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे हातातोंडाशी आलेलं कोबी पीकाची नासाडी झाली. आधीच कर्जाचा डोंगर आणि त्यात हैदराबादमध्ये एमबीबीएस’चं शिक्षण घेणाऱ्या लेकीची फी कसी भरायची, याची चिंता मधुकर पळसकरांना भेडसावू लागली. या चिंतेतून त्यांनी गळफास घेऊन आयुष्य संपवलं.
कर्ज आणि मुलींच्या फी मुळे आधीच संकटात अडकलेल्या पळसकर कुटुंबाला मधुकर यांच्या आत्महत्येमुळे आणखीच धक्का बसला. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन विवाहित मुली आणि मुलगा असा परिवार आहे. त्यातच पळसकरांच्या आत्महत्येमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
Thane News : दिवा सर्कल रोड दुचाकी चालकांसाठी ठरतोय मृत्यूचा सापळा, अपघातांना जबाबदार कोण?
तर दुसरीकडे धाराशिवमध्येही शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. धाराशिवमधील तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील शेतकऱ्याने गळफास घेत आत्महत्या केली. उमेश सूर्यकांत ढेपे (४५) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. उमे यांनी आपल्या राहत्या घरीच गळफास घेत आत्महत्या केली.
नांदेड जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक नदी-नाल्यांमध्ये पूर निर्माण झाला आहे. यामुळे नांदेड शहराजवळील वाहेगाव परिसरात गोदावरी नदीकाठी शेती पूर्णपणे नासाडी झाली आहे.
वाहेगाव येथील पंडित वामनराव सोनटक्के (वय ५९) यांचे दोन-दोन एकर शेतीत लागवड केलेले सोयाबीन पाण्यात बुडून पूर्णपणे खराब झाली आहे. स्थानिक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून प्रशासनाने प्रभावित भागाचे नुकसान पाहणीसाठी तातडीने पथक पाठवले आहे.