नांदेड जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक नदी-नाल्यांमध्ये पूर निर्माण झाला आहे. यामुळे नांदेड शहराजवळील वाहेगाव परिसरात गोदावरी नदीकाठी शेती पूर्णपणे नासाडी झाली आहे.
यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील कोळी गावात सतत मुसळधार पावसामुळे ठाकूरसिंग राठोड यांचे घर आज सकाळी कोसळले. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही
पहाटे सव्वा पाचच्या सुमारास घराबाहेर पडलेल्या एका व्यक्तीला हुसेन शाह रोडवर विजेचा धक्का बसला. त्याला एसएसकेएम रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
कार्डिगडमध्ये ढगफुटी झाल्यानंतर मुख्य बाजारात मोठ्या प्रमाणात ढिगारा साठला. यामुळे दोन ते तीन मोठी हॉटेल्सचे नुकसान झाले तर एका बाजारात बांधलेली सुमारे 7 ते 8 दुकाने कोसळली.
पंजाबमध्ये पुरामुळे मृतांचा आकडा 51 वर पोहोचला आहे आणि 3.87 लाख लोक प्रभावित झाले आहेत. 4.34 लाख एकर क्षेत्रातील पिकेही उद्ध्वस्त झाली आहेत. राज्य सरकारने प्रति एकर 20000 रुपये भरपाई…
जिल्हा प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करून पीडित शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम करावे. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, असे निर्देश राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कृषी आणि महसूल विभागाला दिले आहेत.
राज्यातील विविध भागांना मुसळधार पावसाने झोडपलं आहे. पुणे, रत्नागिरी, मुंबईसह सांगलीमध्ये जोरदार पाऊस होत आहे. रायगडमध्ये मुसळधार पावसामुळे बहुतांश शाळा बंद करण्यात आल्या आहेत.
जूनमध्ये कोकण, पश्चिम व उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांत चांगला पाऊस झाला. यंदा मे महिन्यात राज्यात चांगला पाऊस झाला. मान्सून वेळेपूर्वी दाखल झाला. परंतु, जून महिन्याच्या सुरुवातीला मान्सूनने ब्रेक घेतला.
पाऊस आणि पावसातला निसर्ग प्रत्येकाचं मन वेधून घेतं. हिरवागार डोंगर आणि धुक्याची चादर म्हणजे पृथ्वीवर अवतरलेला स्वर्गच. पावसात फिरण्यासाठी अशी काही धुक्याने वेढलेली गावं आहेत ज्यांना एकदातरी पावसाळ्यात भेट देणं…
पंचगंगा आणि कुंभी नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर कोकणातील जगबुडी, कोदवली, शास्त्री आणि असावी या प्रमुख नद्यांनी इशारा पातळी ओलांडत असून, काही गावांचा संपर्क तुटला आहे.
मुंबईत आणि उपनगरात रात्रभर मुसळधार पाऊस सुरु आहे. सखल भागांत रस्त्यांवर पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिकांना साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागत आहे. त्यासोबतच मुंबई लोकल उशिराने सुरु आहे.
सांगली, सोलापूर, कोल्हापूर, कोल्हापुरचा घाट परिसर, सातारा, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा आहे.
मका, कपाशी, मिरची लागवड करण्याकडे सध्या शेतकऱ्यांचा कल आहे. मात्र, अजूनही काही कोरडवाहू शेतकरी निसर्गाच्या दमदार पावसाची प्रतीक्षा करत आकाशाकडे डोळे लावून बसलेले आहे.
जून ते सप्टेंबर या कालावधीत राज्यात व जिल्ह्यांमध्ये पुर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने तसेच यावर्षी मान्सून लवकर दाखल झाल्याने पहिल्याच पावसात तात्पुरत्या स्वरूपाची पुरपरिस्थिती निदर्शनास आली आहे.
खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणाच्या कडेला मासेमारी करणाऱ्या तरुणाचा वीज कोसळून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली आहे. संतोष गुलाब खांडवे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
एक साधू आणि दोन नागरिक अडकले पुराच्या पाण्यात, मंदिराच्या चारी बाजूने पाणीच पाणी, साधू आणि नागरिक मंदिरात अडकल्याची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन अलर्ट झाले.