higher electricity bill agitation case charges fixed against rahul narvekar and mangalprabhat lodha verdict of special court in presence of all accused denial of the allegation by all nrvb
मयुर फडके, मुंबई : करोना काळातील (Covid-19 Pandemic) टाळेबंदीदरम्यान (Lockdown) वाढीव वीज बिलाचा (Higher Electricity Bills) मुद्द्यावरून आंदोलन (Agitation) केल्याप्रकरणी महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष राहुल नार्वेकर (Current Speaker of Maharashtra Legislative Assembly Rahul Narvekar) आणि कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा (Cabinet Minister Mangal Prabhat Lodha) यांच्याविरोधात विशेष न्यायालयात (Special Court) गुरुवारी आरोप निश्चित करण्यात आले.
गुरुवारी खटला जेव्हा सुरू झाला तेव्हा, नार्वेकर आणि लोढा यांच्यासह सर्वजण विशेष न्यायालयात न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर हजर होते. आरोपांचे न्यायालयाने वाचन केले असता सर्वांनी आरोप फेटाळून लावले. त्यानंतर, न्यायाधीशांनी भादंवि कलम ३५३, ३४१, ३३२, १४३, १४७, तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायदा आणि महामारी प्रतिबंध कायद्यांतर्गत २० आरोपींविरुद्ध आरोप निश्चित करून प्रकरणाची पुढील सुनावणी १७ मे रोजी निश्चित केली आहे.आता आरोप निश्चित झाल्यानंतर या सर्व आरोपींविरोधात त्यांचा खटला सिद्ध करण्यासाठी राज्य सरकार साक्षीदारांची यादी दाखल करेल.
[read_also content=”पाण्यात सुरू होती त्यांची प्रणयक्रीडा, आजवर कधीही नसेल पाहिला असा नाग-नागिणीचा रोमँटिक डान्स, व्हायरल झाला दुर्मिळ व्हिडिओ https://www.navarashtra.com/viral/such-a-romantic-nag-nagins-dance-would-not-have-been-seen-till-yet-rare-on-social-media-video-went-viral-nrvb-394973.html”]
न्यायालयात हजर असताना नगरसेवक व बेस्ट सदस्य सुनील गणाचार्य यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांच्या वकीलांनी भाजप नेत्यांना वैद्यकीय मदतीची गरज असल्याची माहिती दिली. न्यायालयाने त्याची दखल घेऊन गणाचार्य यांनी त्याच्यावरील आरोपांचे खंडन केल्याचे नोंदवून वैद्यकीय कारणास्तव कार्यवाही संपण्यापूर्वी त्यांना जाण्यास परवानगी दिली.
२०२० मध्ये करोनामुळे निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीत वाढीव वीज बिलांमुळे सर्वसामान्यांच्या तोडांचे पाणी पळाले होते. त्याविरोधात नार्वेकर, लोढा यांच्यासह अनेक भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन पुकारले. बेस्टच्या महाव्यवस्थापकांना रोखण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आणि लोढा आणि नार्वेकर यांच्यासह भाजपच्या १४ कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंदवला होता.
[read_also content=”आजचे राशीभविष्य : 4 May 2023, कसा जाईल आजचा दिवस; वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/web-stories/today-daily-horoscope-4-may-2023-rashibhavishya-in-marathi-nrvb/”]
त्या प्रकरणी विशेष न्यायालयासमोर आरोप निश्चितीची प्रक्रिया सुरू झाली होती. मात्र, सुनावणीला वारंवार अनुपस्थित राहिल्यामुळे संतप्त होऊन न्यायालयाने लोढा आणि नार्वेकर अन्य आरोपींविरोधात ५ हजार रुपयांचे जामीनपात्र वॉरंट बजावले होते. त्यानंतर सर्व आरोपी न्यायालयात तातडीने उपस्थित राहिल्यानंतर न्यायालयाने वॉरंट मागे घेतले होते.