पोलिस कर्मचाऱ्यानेच पत्नीवर गोळी झाडून केली हत्या; सासूसह मेहुणा गंभीर
हिंगोलीतून धक्कादायक घटना घडली आहे. राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानाने स्वत:च्या कुटुंबावर बेछूट गोळीबार केला असून यात त्याची पत्नी ठार झाली आहे. तर मुलगा आणि सासूसह एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर एकच खळबळ माजली आहे. विलास मुकाडे असं पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे
तर दीड वर्षाच्या चिमुकल्यासह सासू आणि आणखी एक जण जखमी झाला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या गोळीबाराची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरु केला आहे. या घटनेनंतर आरोपी पोलीस कर्मचाऱ्याने पळ काढला आहे. पोलिसांनी त्याच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. या पोलीस कर्मचाऱ्याने गोळीबार का केला, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात मुख्य सूत्रधार सापडत नव्हता. पण आज या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. सतीश वाघ यांच्या हत्येची सुपारी त्यांच्याच पत्नीने दिल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या गुन्हे शाखेने वाघ यांच्या पत्नीला अटक केली आहे.
सतीश वाघ यांच्या पत्नीनेच त्यांच्या हत्येची सुपारी दिली होती. सतीश वाघ यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शिंदवणे घाटात सतीश वाघ यांचा मृतदेह आढळला होता. या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता सतीश वाघ यांची पत्नी या संपूर्ण हत्याकांडाची मास्टरमाईंड असल्याचं समोर आलं आहे. सतीश वाघ हे भाजपचे विधान परिषद आमदार योगेश टिळेकर यांचे मोमा होते.
हडपसरमधील शेतकरी तसेच व्यावसायिक सतीश वाघ यांच्या अपहरण व खूनप्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. पत्नीनेच सतीश वाघ यांच्या खूनाची सुपारी दिल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी सतीश वाघ यांच्या पत्नीला अटक केली आहे. हडपसरमधील हॉटेल व्यावसायिक तसेच शेतकरी असलेले सतीश ताताब्या वाघ (वय ५९) यांची ९ डिसेंबर रोजी पहाटे मॉर्निंग वॉकसाठी गेल्यानंतर अपहरणकरून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचा मृतदेह शिंदवणे घाटात फेकून देण्यात आला होता.
पोलिसांनी खूनाचा उलघडा करत हा खून सुपारी देऊन केल्याचे समोर आणत पाच जणांना अटक केली होती. खूनात प्रथम वाघ यांच्या घरी भाड्याने राहणाऱ्या अक्षय हरीश जावळकर याने ५ लाखांची सुपारी देऊन केल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता तपासात सतीश वाघ यांच्या खूनाची सुपारी सतीश वाघ यांच्याच पत्नीने दिल्याचं समोर आलं आहे. गुन्हे शाखेने पत्नीला अटक केली असून तपास सुरू केला आहे. अनैतिक संबंधातून हा खून केल्याचं सांगितलं जात आहे.