टिटवाळा : कल्याण तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनच्या (Kalyan Taluka Gramin Police Station) हद्दीतील टिटवाळ्यात (Titwala) दुकानात नोकरी (Job In Shop) करीत असलेल्या नोकराने (Servent) आपल्या दोन मित्राच्या मदतीने (With The Help Of Two Friends) मालकाला कल्याण तालुक्यातील दहागाव (Dahagaon) जंगलात गळा दाबून मारल्याची (Strangled To Death) घटना उघडकीस आली आहे. पुरलेल्या मृतदेहाचा हात जमिनी बाहेर दिसून आल्याने (Pile Of Dirt) खुनाला वाचा फुटली. टिटवाळा पोलिसांच्या (Titwala Police) गुन्हे प्रकटीकरण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंगटे व त्यांच्या पथकाने या प्रकरणी तीन जणांना ताब्यात घेतले आहे.
टिटवाळा डी.जे वन याच्या बाजूला सचिन म्हामाने यांचे दुकान असून या दुकानात सुनील मोरे हा नोकर म्हणून काम करीत होता. दुकानाच्या मालाचे वसुलीचे काम सुनील करीत होता. बिल वसुली बाबत मालक असलेले सचिन म्हामाने यांच्यात सतत खटके उडत होते. तसेच आपल्या पत्नी समवेत नोकराचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयाने त्या दोघांमध्ये वादावादी होत धुसफूस सुरू होती. सततच्या होणाऱ्या वादावादी मुळे नोकर असणारा सुनील मोरे रा. टिटवाळा यांनी हत्येची योजना आखली. आपल्या दोन मित्र असलेल्या शुभम गुप्ता व अभिषेक मिश्रा यांना योजनेची माहिती देत दुकानाचे मालक असलेले सचिन म्हामाने यांना कल्याण तालुक्यातील दहागाव येथील जंगलात गोडीगुलाबीने घेऊन गेले.
[read_also content=”आता लय त्रास होतोय! भोंग्यांचा प्रश्न पुन्हा उच्च न्यायालयात, वाढत्या ध्वनी प्रदुषणाविरोधात वयोवृद्धाची याचिका; वारंवार तक्रार करूनही दखल न घेतल्याने न्यायालयात घेतली धाव https://www.navarashtra.com/maharashtra/mosque-loudspeaker-issue-back-in-high-court-elderly-pleads-against-increasing-noise-pollution-after-complaining-repeatedly-they-did-not-take-notice-and-approached-the-high-court-nrvb-384128.html”]
दोघांनी हातपाय धरून सुनीलने दुकान मालकाचा गळा आवळून त्यांचा खून केला. पती घरी येत नसल्याने त्यांच्या पत्नीने टिटवाळा पोलीस स्टेशनमध्ये मिसिंगची तक्रार दाखल केली. मात्र दोन दिवसापूर्वी जंगलात जमिनीत गाढण्यात आलेल्या मातीच्या ढिगाऱ्यातून मृतदेहाचे हात वर आल्याने याबाबत टिटवाळा पोलिसांना माहिती देण्यात आली.
टिटवाळा पोलीस स्टेशनचे सीनियर इन्स्पेक्टर जितेंद्र ठाकूर यांनी याबाबत तपास करण्याचे आदेश गुन्हे प्रकटीकरण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंगटे व त्यांच्या पथकाला दिले. याबाबत मृतदेह उकरून काढल्यानंतर मयताची गाडी एका किलो अंतरावर दिसून आली. याबाबत मृतदेह ताब्यात घेत हत्या झाल्याची माहिती उघड झाली.
[read_also content=”आश्चर्यकारक! जगात वाजतो आहे भावाचा डंका, १ मिनिटात २ बोटांच्या आधारावर काढल्या २२ पुशअप्स; आणि… https://www.navarashtra.com/viral/amazing-chinese-boy-in-the-world-22-push-ups-done-with-2-fingers-in1-minute-guinness-world-record-in-his-name-nrvb-384036.html”]
पत्नीच्या चारित्र्याबाबत नोकरावर संशय घेतल्याने या वादातून दुकान मालकाची हत्या केल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. मृतदेहाचा दफन केलेला हात जमिनीबाहेर आल्याने या खुनाला अखेर वाचा फुटली. पोलिसांनी कुशलतेने तपास करत माहिती घेतली असता दुकानात काम करीत असलेल्या सुनील मोरे व त्यांच्या दोन मित्रांनी ही हत्या केल्याचे चौकशीत समोर आले आहे. पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेत आठवड्याभरात जमिनी बाहेर आलेल्या हातामुळे खुनाच्या कटातील आरोपी गजाआड केले आहेत.