
मुंबई : ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. हरी नरके (Hari Narke) यांचे निधन झाले. वयाच्या 70 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. (Hari Narke Passes Away) डॉ. नरके यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्यांना मुंबईतील एशियन हार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वीच डॉ. नरके यांच्यावर ह्रदयाची शस्त्रक्रिया झाली होती. पण नुकतेच त्यांना रुग्णालयात उपचारांसाठी भरती करण्यात आले होते. मात्र, आज त्यांचे निधन झाले. त्यामुळं साहित्य तसेच समता परिषदेची मोठे नुकसान झाले अशी भावना आहे. (how was dr hari narke literary and equality journey read these special ten things about him)
ज्येष्ठ विचारवंत, माझे मार्गदर्शक प्रा. हरी नरके सरांच्या निधनाची बातमी धक्कादायक व वेदनादायी आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, हीच आई-जगदंबेचरणी प्रार्थना! त्यांच्या निधनाने क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या विचारांचा गाढा अभ्यास असणारे… pic.twitter.com/gQEfvccCZI — Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) August 9, 2023
डॉ. हरी नरकेंचा ‘या खास’ दहा गोष्टी…
पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे ते अध्यासन प्राध्यापक होते.
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य देखील होते.
भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर उपाध्यक्ष देखील होते.
प्रा. हरी नरके यांची दोन पुस्तके प्रसिद्ध आहेत. महात्मा फुले यांची बदनामी : एक सत्यशोधन आणि महात्मा फुले – शोधाच्या नव्या वाटा या दोन पुस्तकांचा समावेश आहे.
फुले व आंबेडकर यांच्या विचारांची व कार्याची प्रस्तुतता अधिक चांगल्या प्रकारे अधोरिखित करणे आणि शासकीय पातळीवर वेगाने निर्णय घडून आणण्यामध्ये हरी नरके यांचा मोलाचा वाटा
महाराष्ट्र शासनाने समग्र महात्मा फुले हा एक हजार पानाचा ग्रंथ अद्ययावत करून प्रकाशित केला
डॉ आंबेडकरांच्या समग्र वाङ्मयाचे राज्य शासनाने 26 खंड प्रकाशित केले, त्यातील सहा खंडांचे संपादन हरी नरके यांनी केले होते.
मराठी भाषा ही संस्कृत, कन्नड, तेलुगू यांप्रमाणेच एक अभिजात भारतीय भाषा आहे हे सिद्ध करण्यासाठी नेमलेल्या रंगनाथ पठारे समितीच्या अहवालात प्रमुख समन्वयक म्हणून प्रा. हरी नरके यांनी योगदान दिले आहे.
महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांचा विचार सर्वाना सोप्या भाषेत सांगितला.
मराठीतील एक प्रसिद्ध लेखक, अभ्यासू संशोधक, वक्ते आणि त्याचबरोबर मराठी ब्लॉगर अशी हरी नरके यांची ओळख राहिली.
ज्येष्ठ विचारवंत, लेखक आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांच्या निधनाचे वृत्त मनाला चटका लावणारे आहे. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो व नरके कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना! ओम शांती! ? pic.twitter.com/1c1Wqotuhm — Rohit Pawar (@RRPSpeaks) August 9, 2023
पुरागामी विचारांचे मोठे नुकसान – भुजबळ
दरम्यान, डॉ. नरके यांच्या निधनामुळं साहित्यिक, सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. डॉ. नरके यांच्या निधनाचे वृत्त समजताच मंत्री छगन भुजबळ यांनी दु:ख व्यक्त केले. ही घटना अत्यंत धक्कादायक असून, पुरागामीचे मोठे नुकसान झाले आहे, असं भुजबळ यांनी म्हटले आहे.
पुरोगामी चळवळीतील एक उमदं व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड
ज्येष्ठ विचारवंत, माझे मार्गदर्शक प्रा. हरी नरके सरांच्या निधनाची बातमी धक्कादायक व वेदनादायी आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, हीच आई-जगदंबेचरणी प्रार्थना! त्यांच्या निधनाने क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या विचारांचा गाढा अभ्यास असणारे सामाजिक व पुरोगामी चळवळीतील एक उमदं व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.
मनाला चटका लावणारे….
ज्येष्ठ विचारवंत, लेखक आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांच्या निधनाचे वृत्त मनाला चटका लावणारे आहे. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो व नरके कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!