Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आषाढी एकादशीनिमित्त श्री संत दामाजीपंताच्या दर्शनासाठी अभूतपूर्व गर्दी

आषाढीच्या (Ashadhi Wari 2022) पार्श्वभूमीवर सावळ्या विठ्ठलाचा भक्त श्री संत दामाजीपंताच्या दर्शनासाठी महिलांनी दिवसभर दर्शनासाठी गर्दी केल्याने मंदिराच्या गाभार्‍यापासून ते चौकातील श्री संत दामाजी पंताच्या पुतळ्यापर्यंत लांबलचक महिलांच्या रांगा लागल्याचे चित्र होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 10, 2022 | 05:27 PM
आषाढी एकादशीनिमित्त श्री संत दामाजीपंताच्या दर्शनासाठी अभूतपूर्व गर्दी
Follow Us
Close
Follow Us:

मंगळवेढा : आषाढीच्या (Ashadhi Wari 2022) पार्श्वभूमीवर सावळ्या विठ्ठलाचा भक्त श्री संत दामाजीपंताच्या दर्शनासाठी महिलांनी दिवसभर दर्शनासाठी गर्दी केल्याने मंदिराच्या गाभार्‍यापासून ते चौकातील श्री संत दामाजी पंताच्या पुतळ्यापर्यंत लांबलचक महिलांच्या रांगा लागल्याचे चित्र होते.

आषाढी वारीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपर्‍यातून भाविक दर्शनासाठी येतात. विठूरायाचे दर्शन घेतल्यानंतर विठ्ठलाचा भक्त म्हणून ओळख असलेल्या श्री संत दामाजीपंताच्या पायावर डोके ठेवल्याशिवाय भाविक परतत नसल्याचा आजपर्यंतचा इतिहास आहे. परिणामी, दामाजीपंतांचे मंदिर दर्शनासाठी सकाळ पासूनच भाविकांनी फुलून गेले होते. गेली दोन वर्षे कोरोनामुळे वारी होवू शकली नाही. आतुर झालेल्या भाविकांनी यंदा मोठी गर्दी केली आहे.

मंदिरातील गाभार्‍यापासून ते चौकातील दामाजीपंताच्या पुतळयापर्यंत लांबलचक कधी नव्हे ते एवढ्या मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी रांगा लागल्याचे पाहून मंगळवेढेकर आश्‍चर्य व्यक्त करत होते. ट्रस्टीने भाविकांच्या फराळाची सोय केल्याने भाविकांनी प्रसाद घेवून समाधान व्यक्त केले.

आतापर्यंत कर्नाटक राज्यातील पंढरपूरकडे जाणार्‍या दिंड्याही या मंदिरात विसावल्या होत्या. आषाढी एकादशीनिमित्त संध्याकाळी भजन, किर्तन अशा धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

मंगळवेढात १८ संत होवून गेल्याने राज्यातही एक पवित्र भूमी म्हणून पाहिले जाते. दामाजीपंत, चोखामेळा, कान्होपात्रा हे विठ्ठलाचे खरे भक्त म्हणून ओळख आहे. येथील किल्ल्याचा बुरूज कोसळल्यानंतर चोखोबारायांचा अंत झाला.

यावेळी त्यांना ओळखणे अवघड बनल्याने त्यांच्या अस्थी कानाला लावले असता त्यामधून विठ्ठल…विठ्ठल…नामाचा गजर ऐकावयास आल्याने हाच मृतदेह चोखोबाचा असल्याचे गृहित धरण्यात आल्याचा इतिहास आहे.

एवढी निष्ठा पांडुरंगावर या संतांची होती. त्यामुळे प्रत्येक भाविक या भुमीत आल्यानंतर त्यांचे दर्शन घेतल्याशिवाय पुढे जात नसल्याचा अनुभव नागरिकामधून कथन केला जातो आहे.

Web Title: Huge number of devotee present in shri sant damajipant for darshan nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2022 | 05:27 PM

Topics:  

  • Ashadhi Wari 2022

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.