मुंबई : आज शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सडकून टीका करीत भाजपच्या एकंदरीत भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांंनी पंतप्रधान मोदी यांच्या 15 ऑगस्टच्या भाषणावर त्यांनी सडकून टीका करीत पंतप्रधान यांना सत्तेत पुन्हा कसा येईन याचीच अधिक चिंता दिसू लागली होती. पंतप्रधान यांचे संपूर्ण भाषणात देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा आव दिसून आला. मी पुन्हा येईन! असे म्हणणारे देवेंद्र फडणवीस आज कोणत्या स्थितीत आहेत. ते आले परंतु, त्यापेक्षा खालील पदावर त्यांना समाधान मानावे लागले, अशा प्रकारे ते येणार असतील तर विचार करायला पाहिजे.
देशभरातून 70 टक्के भाजपविरोधी सूर
देशभरातून भाजपविरोधात सूर असल्याचे मला दिसत असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. यावेळी त्यांनी बोलताना, येत्या लोकसभेची पंतप्रधानांना चिंता असल्याने परत आपले सरकार येणार का नाही, या काळजीमुळे ते सारखे मी पुन्हा येईन असे म्हणताना दिसत असल्याचे लाल किल्ल्याच्या भाषणात दिसून आल्याचे त्यांनी सांगितले. येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या बाजूने कौल लागणे कठीण आहे, बहुधा याची जाणीव पंतप्रधान यांना झाल्याने ते व्यथित झाल्याचे पाहायला मिळाले, असेही शरद पवार यांनी सांगितले.
मणिपूर जळत असताना पंतप्रधान पुढील निवडणुकीसाठी तयारी करताना
मणिपूर 3 महिने जळत असताना, पंतप्रधान संसदेत 3 मिनिटे बोलले. मणिपूरचे परिणाम शेजारच्या राज्यांना होणार असेअसताना पंतप्रधान पुढील निवडणुकीसाठी तयारी करीत आहेत. मला वाटले होते, ते 15 अॉगस्टला ते मणिपूरवर बोलतील, काही तरी विशेष बाबी सांगतील परंतु, पंतप्रधानांना मी पुन्हा कसा येईन याची चिंता होती. त्यांनी उलट मी पुन्हा येईन असे सांगितले.
मोदी सरकारच्या अनेक निर्णयांमुळे समाजात तेढ
मोदी सरकार हे राज्यातील अनेक सरकार पाडण्याचे मोठे प्रयत्न केले. मध्य प्रदेशपासून महाराष्ट्रापर्यंत त्यांनी कशा पद्धतीने सरकार पाडले हे संपूर्ण जनतेने पाहिले. नॉर्थ इस्टमध्ये ज्या काही गोष्टी घडवल्या जात आहेत. किंवा घडत आहे. मणिपूरवर जो संघर्ष चालू आहे, गेली 3 महिने हा संघर्ष चालू असताना, पंतप्रधान संसदेत फक्त 3 मिनिटे बोलतात.