Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

AI Impact Expo 2026: AI समिट भारतासाठी ठरणार गेमचेंजर! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज होणार उद्घाटन, वाचा सविस्तर

India AI Impact Summit: दिल्लीतील भारत मंडपममध्ये इंडिया एआई इम्पॅक्ट एक्सपो 2026 आणि इंडिया एआई इम्पॅक्ट समिटचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात 25 लाखांहून अधिक लोकं सहभागी होतील, अशी शक्यता आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 16, 2026 | 11:01 AM
AI Impact Expo 2026: AI समिट भारतासाठी ठरणार गेमचेंजर! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज होणार उद्घाटन, वाचा सविस्तर

AI Impact Expo 2026: AI समिट भारतासाठी ठरणार गेमचेंजर! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज होणार उद्घाटन, वाचा सविस्तर

Follow Us
Close
Follow Us:
  • इंडिया एआई इम्पॅक्ट एक्सपो 2026 आणि इंडिया एआई इम्पॅक्ट समिटचे भारत मंडपममध्ये आयोजन
  • एक्सपोमध्ये 300 हून अधिक सुनियोजित प्रदर्शन पवेलियन आणि थेट प्रात्यक्षिके
  • इंडिया एआई इम्पॅक्ट समिटदरम्यान 500 हून अधिक सेशनचे आयोजन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज 16 फेब्रुवारी रोजी, सायंकाळी 5 वाजता इंडिया एआई इम्पॅक्ट एक्सपो 2026 चे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन नवी दिल्ली येथील भारत मंडपममध्ये करण्यात आले आहे. इंडिया एआई इम्पॅक्ट एक्सपो 2026 आणि इंडिया एआई इम्पॅक्ट समिटचे आयोजन भारत मंडपममध्ये करण्यात आले असून 16 ते 20 फेब्रुवारी 2026 पर्यंत हा कार्यक्रम सुरु राहणार आहे. हे प्रदर्शन एआयच्या व्यावहारिक वापराचे राष्ट्रीय प्रदर्शन असेल जिथे पॉलिसी आणि सराव यांचा मेळ बसतो, इनोवेशन व्यापक होते आणि तंत्रज्ञान सामान्य नागरिकांशी जोडले जाते.

Nothing ची भारतात दमदार एंट्री! सुरु केलं देशातील पहिलं फ्लॅगशिप स्टोअर, ग्राहक उत्साहित

कार्यक्रमामध्ये सहभागी होणार 13 देशांचे पवेलियन

70,000 स्क्वेअर मीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळात पसरलेल्या एक्सपोमध्ये ग्लोबल टेक कंपन्या, स्टार्टअप, शैक्षणिक आणि संशोधन संस्था, केंद्रीय मंत्रालये, राज्य सरकारे आणि आंतरराष्ट्रीय भागीदार एकत्र येतील. आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये 13 देशांचे पवेलियन असणार आहेत, जे एआई इकोसिस्टममधील आंतरराष्ट्रीय सहकार्याचे प्रदर्शन करतील. यामध्ये ऑस्ट्रेलिया, जपान, रशिया, युनायटेड किंग्डम, फ्रान्स, जर्मनी, इटली, नेदरलँड्स, स्वित्झर्लंड, सर्बिया, एस्टोनिया, ताजिकिस्तान आणि आफ्रिका हे देश सहभाग घेणार आहेत. (फोटो सौजन्य – X)

300 हून अधिक पवेलियन, 600 स्टार्टअप आणि लाईव्ह परफॉर्मंस

एक्सपोमध्ये 300 हून अधिक सुनियोजित प्रदर्शन पवेलियन आणि थेट प्रात्यक्षिके असतील, जे लोकं, ग्रह आणि प्रगती या थीमवर आधारित असणार आहेत. 600 हून अधिक उच्च-क्षमता असलेले स्टार्टअप्स या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. हे स्टार्टअप्स अशा कार्यरत उपायांचे प्रदर्शन करतील जे आधीच वास्तविक जगात वापरले जात आहेत. इंडिया एआई इम्पॅक्ट एक्सपो 2026 मध्ये अंतरराष्ट्रीय प्रतिनिधींसह 25 लाखांहून अधिक लोकं सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जागतिक एआय इकोसिस्टममध्ये भागीदारी वाढवणे आणि व्यवसायाच्या संधी निर्माण करणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.

500 हून अधिक सेशन आणि 3250 स्पीकर्स

इंडिया एआई इम्पॅक्ट एक्सपो 2026 आणि इंडिया एआई इम्पॅक्ट समिटदरम्यान 500 हून अधिक सेशन आयोजित केले जाणार आहेत, ज्यामध्ये 3250 हून अधिक दूरदर्शी स्पीकर्स आणि पॅनल मेंबर्स सहभागी होतील. या सेशनचा उद्देश विविध क्षेत्रांमधील एआयचा परिवर्तनात्मक प्रभाव ओळखणे आणि प्रत्येक जागतिक नागरिकाला एआयचा फायदा व्हावा यासाठी भविष्यातील कृतींवर चर्चा करणे, असा असणार आहे. इंडिया एआई इम्पॅक्ट एक्सपो 2026 आणि इंडिया एआई इम्पॅक्ट समिट दरम्यान अनेक जागतिक नेते आणि उद्योग क्षेत्रातील नेते एकाच मंचावर पाहायला मिळणार आहेत.

भव्य ‘भारत मंडपम’मध्ये शिखर संंमेलन आयोजित

शिखर संंमेलन 16 ते 20 फेब्रुवारीपर्यंत भव्य ‘भारत मंडपम’मध्ये आयोजित करण्यात आले आहे. ज्यामध्ये धोरणकर्ते, उद्योग नेते आणि तंत्रज्ञान नवोन्मेषक एकत्र येतील. हे जागतिक शिखर संमेलन म्हणजेच भारतासाठी केवळ एखाद्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी नाही तर एआय युगातील नियम, मानके आणि संधींना आकार देणारी एक प्रमुख शिल्पकार बनण्याची त्याची इच्छा अधोरेखित करते.

Free Fire Max: अखेर तो क्षण आला! प्लेअर्ससाठी Mystery Shop लाईव्ह, बंडल आणि ईमोट कमावण्याची संधी

अनेक जागतिक नेते परिषदेत होणार सहभागी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणाचा मान राखून फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि ब्राझीलचे अध्यक्ष लुला दा सिल्वा यांच्यासह अनेक जागतिक नेते या परिषदेत सहभागी होणार आहेत. 45 हून अधिक देशांचे मंत्रीस्तरीय शिष्टमंडळ या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस आणि विविध आंतरराष्ट्रीय संघटनांचे वरिष्ठ अधिकारी देखील या चर्चेत सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. भारतात आयोजित केल्या जाणाऱ्या या परिषदेत सुंदर पिचाई, सॅम ऑल्टमन, डेमिस हसाबिस, डारियो अमोदेई आणि ब्रॅड स्मिथ सारखे आघाडीचे जागतिक तंत्रज्ञानातील दिग्गज सहभागी होणार आहेत.

Web Title: India ai impact expo 2026 will start from 16 february 2026 prime minister narendra modi will do inauguration tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 10:58 AM

Topics:  

  • Artificial intelligence
  • Prime Minister Narendra Modi
  • tech event

संबंधित बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आसाम दौऱ्यावर; उत्तराखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची बैठक
1

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आसाम दौऱ्यावर; उत्तराखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची बैठक

मुंबईत मॅन्युफॅक्चरिंग सुरू होणार AI सेंटर, आयआयटी बॉम्बेने कोलंबिया विद्यापीठासोबत केला सामंजस्य करार
2

मुंबईत मॅन्युफॅक्चरिंग सुरू होणार AI सेंटर, आयआयटी बॉम्बेने कोलंबिया विद्यापीठासोबत केला सामंजस्य करार

Samsung Galaxy Event 2026: काउंटडाउन सुरू! कंपनीने आगामी ईव्हेंटची तारीख केली जाहीर, पॉवरफुल Galaxy S26 ची प्री-ऑर्डर सुरू
3

Samsung Galaxy Event 2026: काउंटडाउन सुरू! कंपनीने आगामी ईव्हेंटची तारीख केली जाहीर, पॉवरफुल Galaxy S26 ची प्री-ऑर्डर सुरू

शिक्षणात AI क्रांती! ‘भारत बोधन’ प्लॅटफॉर्ममुळे मोबाईलवर मिळणार ऑडिओ-व्हिडिओ लेक्चर्स
4

शिक्षणात AI क्रांती! ‘भारत बोधन’ प्लॅटफॉर्ममुळे मोबाईलवर मिळणार ऑडिओ-व्हिडिओ लेक्चर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.