Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

माजी खासदार इम्तियाज जलील नांदेडसह ‘या’ मतदारसंघात लढवणार निवडणूक

नांदेडमध्ये कॉंग्रेस नेते वसंतराव चव्हाण यांचा विजय झाला होता. मात्र त्यांचे निधन झाल्यामुळे कॉंग्रेसकडून त्यांच्या मुलाला उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 17, 2024 | 06:59 PM
माजी खासदार इम्तियाज जलील नांदेडसह 'या' मतदारसंघात लढवणार निवडणूक

माजी खासदार इम्तियाज जलील नांदेडसह 'या' मतदारसंघात लढवणार निवडणूक

Follow Us
Close
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर: केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. कालपासून राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुकीची घोषणा होताच राज्यात राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी बैठकांवर बैठका घेत आहेत. त्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने नांदेडच्या जागेवर लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर केली आहे. दरम्यान आता एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी देखील निवडणुकीबाबत मोठे भाष्य केले आहे.

इम्तियाज जलील यांनी नांदेडच्या लोकसभेसाठी पोटनिवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तर यासोबतच त्यांनी विधानसभा निवडणूक देखील लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. छत्रपती संभाजीनगरमधून इम्तियाज जलील हे विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्या निवडणुकीला उभे राहिल्यामुळे कोणाला फटका बसणार हे पहावे लागणार आहे.  नांदेडमध्ये लोकसभा निवडणूक लढवण्याची संधी आलेली आहे. मी राज्यातील एकमेव मुस्लिम खासदार होतो. त्याला पाडण्यासाठी कशी मेहनत घेतली ते लोकांनी पाहीले आहे. एमआयएम पक्ष राज्यात आल्यानंतर सर्वात अधिक प्रतिसाद हा नांदेडमध्ये मिळाला आहे, असे  इम्तियाज जलील म्हणाले.

नांदेडमध्ये यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेसचे वसंतराव चव्हाण निवडून आले. त्यांनी भाजपच्या प्रतापराव चिखलीकर यांचा पराभव केला. नांदेडमध्ये भाजपचा पराभव हा धक्कादायक समजला जात आहे. त्यामुळे आता या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे.

नांदेड लोकसभेत कॉँग्रेसने दिला उमेदवार

केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. त्याचबरोबर राज्यातील एका जागेसाठी लोकसभा पोटनिवडणुक देखील जाहीर केली होती. नांदेड लोकसभा पोटनिवडणूक जाहीर असून यासाठी कॉंग्रेसकडून उमेदवार देखील जाहीर करण्यात आला आहे. पत्रक जारी करत काँग्रेसने उमेदवार जाहीर केला आहे.

नांदेडमध्ये कॉंग्रेस नेते वसंतराव चव्हाण यांचा विजय झाला होता. मात्र त्यांचे निधन झाल्यामुळे कॉंग्रेसकडून त्यांच्या मुलाला उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. वसंतराव चव्हाण यांचे पुत्र रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसने नुकतंच एक परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकात काँग्रेसकडून नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. आता नांदेड लोकसभा पोटनिवडणुक बिनविरोध होणार की महायुती देखील उमेदवार जाहीर करणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

 

Web Title: Imtiaz jalil fight to nanded loksabha by election and chatrpati sambhajinagar assembly seat 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2024 | 06:59 PM

Topics:  

  • Imtiaz Jalil

संबंधित बातम्या

Maratha Reservation : इम्तियाज जलील भगवं उपरणं घालून उतरले आझाद मैदानात! मराठा आरक्षणाबाबत मुस्लीम समाजाची भूमिका काय?
1

Maratha Reservation : इम्तियाज जलील भगवं उपरणं घालून उतरले आझाद मैदानात! मराठा आरक्षणाबाबत मुस्लीम समाजाची भूमिका काय?

पोलिस डिपार्टमेंटकडून तेवढं मिळत नसेल म्हणून…? संजय शिरसाट यांच्या ‘त्या’ वक्तव्याचा इम्तियाज जलीलकडून समाचार
2

पोलिस डिपार्टमेंटकडून तेवढं मिळत नसेल म्हणून…? संजय शिरसाट यांच्या ‘त्या’ वक्तव्याचा इम्तियाज जलीलकडून समाचार

Imtiaz jaleel : सगळा देश लष्कर आणि सरकारच्या पाठीशी
3

Imtiaz jaleel : सगळा देश लष्कर आणि सरकारच्या पाठीशी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.