कोल्हापूर : इचलकरंजीमध्ये धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. इचलकरंजी महानगरपालिकेत आज सकाळी एकाच वेळी दोन आयुक्तांनी पदभार घेतला स्वीकारला. यामुळे पालिकेमध्ये एकच गोंधळ उडाला. आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांची बदली करण्यात आली होती. त्यांच्या जागी पल्लवी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र ओमप्रकाश दिवटे यांनी बदलली स्थगिती आणली. त्यादरम्यानच पल्लवी पाटील आयुक्त यांनी पदभार स्वीकारला होता. त्यामुळे आज दोन्ही आयुक्त एकाचवेळी महापालिकेत दाखल झाले.
इचलकरंजी महापालिकेमध्ये आयुक्त कॅबिनमध्ये दोन्ही आयुक्त दाखल झाले. सकाळी दोघांनी देखील पदभार स्वीकारला. ओमप्रकाश दिवटे आणि पल्लवी पाटील हे एकाच वेळी कॅबिनमध्ये दोन खुर्चा टाकून बसले होते. त्यामुळे एक कॅबिन आणि महानगरपालिकेचा दाबा दोन आयुक्तांनी घेतलेला दिसून आला. दोन्ही आयुक्तांमध्ये पदभार घेताना वादावादी झाली. इतकंच नाही तर दोन्ही आयुक्तांनी एकमेकांच्या शेजारी दोन खुर्च्या लावून कामकाज केलं. आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी कागदपत्रे सादर केल्यानंतर सुद्धा पल्लवी पाटील पदभार सोडत नव्हत्या. याचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल झाले आहेत.
इचलकरंजीमध्ये दोन आयुक्त असल्याने एकच खळबळ उडाली. दोघांनी कामकाज सुरु केल्यानंतर एक तासाने कागदपत्रे सादर केल्यानंतर व वरिष्ठाचा फोन आल्यानंतर पल्लवी पाटील यांनी आपला पदभार सोडला. पल्लवी पाटील यांना वरिष्ठांचा फोन आल्यानंतर त्यांनी पदभार सोडण्यास पसंती दिली. त्यापूर्वी दोन्ही आयुक्तांमध्ये पदभारावरुन वादावादी झाली. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण अर्थात मॅटने पल्लवी पाटील यांच्या नियुक्तीला नुकतीच स्थगिती दिली आहे.