माळशिरसमध्ये माऊलींच्या पालखीचे दुसरे गोल रिंगण
माळशिरस : माऊली माऊलीच्या जयघोषत सकाळच्या सत्रात लाखोंच्या उपस्थित श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील दूसरे गोल रिंगण खुडूस ता.माळशिरस फाटा येथे तीन फेरा पूर्ण करून अपार अशा उत्साहात पार पडले. माळशिरस येथील पहाटे पाच वाजता पालखी सोहळा प्रमुख हस्ते महापूजा उरकून सकाळी सहा वाजता सोहळ्याने दूसरा गोल रिंगण कडे खुडूस फाटाकडे आगेकूच केली.
सकाळीच्या उबदार हवामानात ज्ञानोबा तुकाराम चा गजर करत माळशिरस तालुका हा वारकरीमय झाला होता. सकाळ च्या थंड हवामानात सोहळा खुडूस फाटा येथे सकाळी 9:03 मिनिटांनी दाखल झाला. त्या अगोदर जरिपटकयाच्या निशाना असलेल्या अश्व नी रिंगण स्थळी प्रवेश केला. सुरूवातीला पालखी रिंगण सोहळ्याय भोवती फिरवून आणून मध्ये भागी असलेल्या चबुतरावर विराजमान करण्यात आली. त्या पाठोपाठ माऊली लवाजमा डोईवर तृळशी वृंदावनाचा घेतलेल्या महिला वारकरी, वीणेकरी आणि दिंडया आल्या. रिंगणात वैष्णवाचा मेळा पोहचताच लाखोंच्या जनसमुदायाने टाळ्याच्या गजरात स्वागत केले. माऊलीच्या पालखीचे व स्वारचे स्वागत व पूजा खुडूस ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले .
बाळासाहेब राजाभाऊ व रामभाऊ चोपदारांनी रिंगण लावून घेतले. चोपदारांनी मानाच्या दिडयांना आत सोडले. त्यानंतर भोंपळे दिंडीतील मानाच्या जरीपटक्याने रिंगण मैदानाला तीन प्रदक्षिणा पूर्ण केल्या. सकाळी 9:46 मिनिटांनी रिंगण चालू झाले. माऊलीच्या अश्वाने दौडण्यास सुरूवात करताच लाखो उपस्थितांनी टाळ्या वाजवत माऊली माऊलीचा गजर सुरू केला व दोनच मिनीटांत तीन फेरां पूर्ण करून उपस्थितच्या डोळ्यांचे पारणे फेडले. रिंगण पूर्ण होताच उपस्थितांची अश्वांच्या टाचेखालील माती कपाळावर लावण्यासाठी झुंबड उडाली होती.
रिंगणाचे अश्व विसावताच वारकरी मैदानात उतरले दिंड्या दिंड्यामध्ये विविध खेळ रंगले. हुतुतू, गड्यास गडी, हमामा, सुरपाट, कबड्डी, खो-खो, फुगडी अशा खेळांनी वारकर्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. चोपदारांच्या निमंत्रणानंतर उडीच्या कार्यक्रमासाठी सर्व दिंड्या पालखीच्या सभोवती गोलाकार बसल्या. टाळ, मृदुंगाच्या साथीने ” ज्ञानोबा माऊली तुकाराम ” अशा गजरात आसमंत व्यापून टाकणारा नादब्रह्म सुरू झाला. वृद्व , महिला अवघी तरुणाई तल्लीन होऊन श्वास रोखून या नादब्रह्मात तीन होऊन गेले होते. एकात्म भक्तीभावाचा हा शाश्वत सुखाचा सोहळा भाविकांनी अनुभवला .
या अगोदर आखीव रेखीव रिंगण – खुडूस फाटा प्रांगणात गोल रिंगणासाठी मैदान तयार करण्यात आले होते. रिंगणाचा तळ पाऊसामुळे ओला होता. भोसरीच्या श्री स्वामी समर्थ आर्टिस्ट राजश्री जुन्नरकर हिने रिंगणाच्या मध्यभागी व गोलाकार नेत्रदिपक रांगोळी काढली होती तर अश्वांच्या रिंगणाच्या मार्गावर रांगोळ्याच्या पायघड्या घातल्या होत्या. यावेळी पालखी सोहळा प्रमुख अँड विकास ढगे विश्वस्त डाॅ अभय टिळक डाॅ अजित कुलकर्णी मालक बाळासाहेब राजाभाऊ व रामभाऊ ऋषीकेश आरफळकर खासदार बंडू जाधव काँग्रेसचे नेते प्रकाश पाटील बाळासाहेब वावरे पांडुरंग वाघमोडे मारुती देशमुख, तुकाराम ठवरे, अँड शहाजी ठवरे भिमराव ठवरे आदी उपस्थित होते. हा सोहळा खुडूस येथील स्वागत होऊन निमगाव पाटी येथे दुपारी विसावा घेऊन वेळापूर नगरी मध्ये विसावला