आषाढी वारीच्या निमित्ताने संत तुकाराम महाराजांची पालखी मार्गस्थ झाली आहे. पालखीने सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश केला असून मोठ्या उत्साहात सोलापूरकरांनी स्वागत केले आहे.
माऊलीच्या भेटीसाठी असंख्य वैष्णवांचा मेळा पंढरपूरी पायी चालत जातात. वारी म्हणजे काय ? आणि आषाढी वारीलाच इतकं महत्व का दिलं जातं वारीची वारीची ही गोष्ट आज जाणून घेऊयात.
राज्यामध्ये आषाढी वारीला सुरुवात झाली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने साताऱ्यामध्ये प्रवेश केला आहे. यावेळी सातारकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने पालखीचे स्वागत केले.
संतांच्या पालख्या सध्या पुण्यामध्ये असल्या तरी लवकरच त्या पुढच्या प्रवासाला लागणार आहेत. लोणी काळभोर येथे कदमवाकवस्ती संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा मुक्काम होणार आहे.
Ashadhi Wari Solhla 2025 : संत तुकाराम महाराजांचे मुस्लीम शिष्य अनगडबाबा शाह दर्गा येथे आजही पालखीचा पहिला विसावा होता. हे पालखीतील हिंदू मुस्लीम ऐक्य दाखवून देते.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्तान उद्या आळंदी येथून होणार आहे. त्यापूर्वी पालखीच्या मानाच्या अश्वांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन घेतले.
येत्या दोन दिवसांमध्ये संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यांचे पुण्यामध्ये आगमन होणार आहे. यासाठी शहरामध्ये वारकऱ्यांच्या निवासाची सोय करण्यात आली आहे.
Devendra Fadnavis Dehu live : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देहूमध्ये पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधून मराठी भाषेबाबत मत व्यक्त केले.
महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या आषाढी वारीची सर्वत्र चर्चा असते. पुणे जिल्ह्यामधील पालखी मार्गाचे आणि पालखी विसावा स्थळाची पाहणी करण्यात आली आहे. यामुळे एक चैतन्यमयी वातावरण आहे.
पहिल्यांदाच वारकरी संप्रदायासाठी स्वतंत्र महामंडळाची निर्मिती केली. वारकऱ्यांपेक्षा कोणी व्हीआयपी नाही. पंढरपूरला आलो तर सगळा व्हीआयपी ताफा बाजूला ठेऊन बुलेटवर फिरलो, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
संत तुकाराम महाराजांचा लवकरच बीडसोहळा पार पडणार आहे. यासाठी देहूनगरी सजत असून मोठ्या उत्साहामध्ये तयारी केली जात आहे. यासाठी विश्वविक्रमी अशी संत तुकाराम महाराजांची पगडी तयार करण्यात आली आहे.
संत तुकराम महाराजांचे अकरावे वंशज ह.भ.प शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केली आहे. देहूतील राहत्या घरी त्यांनी उपरण्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आर्थिक विवंचनेतून ही आत्महत्या झाल्याचा अंदाज व्यक्त…
महाराष्ट्राभरामध्ये आषाढी वारीचा उत्साह आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश केला आहे. माउलींच्या पालखीचे दुसरे गोल रिंगण पार पडले.
संत तुकाराम महाराज पालखी सोहळा बारामतीमध्ये दाखल झाला आहे. अजित पवार यांनी सपत्नीक पालखीचे दर्शन घेतले. तसेच अजित पवार बारामती ते काटेवाडी अशी पायी वारी देखील करणार आहेत.
संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जेजुरीमध्ये दाखल झाली आहे. यावेळी खंडेरायाच्या नगरीमध्ये बेल भंडाराची उधळण करत गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने पालखीचे स्वागत केले.
संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सध्या मार्गस्थ होत आहे. यावेळी एक दिंडीमध्ये गॅस सिलेंडरला आग लागली. यावेळी पुणे अग्निशमन दलाने तातडीने ही आग विजवण्यामुळे मोठा अनर्थ टळला.