typical answers of the official class on the water issue kalyan mla vishwanath bhoir raised his voice nrvb
कल्याण : आमदार विशवनाथ भोईर यांच्या निधीतून सुमारे २ कोटी ९५ लक्ष निधी देत मांडा टिटवाळा परिसरात विविध विकासकामांचे शुभारंभ रविवारी संपन्न झाला. कल्याण पश्चिम विधानसभा आमदार विशवनाथ भोईर यांच्या आमदार निधीतून मांडा-टिटवाळा परिसरात १४ विकासकामे मंजूर केली असून, त्या कामांचे भूमिपूजन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
शिवसेना व ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित
यावेळी आमदार विशवनाथ भोईर शहर प्रमुख रवी पाटील, उपशहर प्रमुख विजय देशेकर, रिपाइंचे टिटवाळा शहर अध्यक्ष विजय भोईर, शिवसेना प्रभाग क्रमांक आठचे शाखाप्रमुख आनंद भोईर, नवचे शाखा प्रमुख सिध्दांत कसबे, दहाचे शाखा प्रमुख अशोक चौरे, विभाग प्रमुख संदीप तरे, तसेच ठाकरे गटाचे शाखा प्रमुख ज्ञानेश्वर मढवी, तसेच शिवसेना व ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विकासकामांसाठी आमदार निधी मंजूर
प्रभाग क्रमांक आठ येथील मांडा मुख्य रस्ता, मांडा बौद्धवाडा अतैगत रस्ते, जुना पोस्ट ऑफिस ते नवीन स्टेशनपर्यंत रस्ता, तसेच प्रभाग क्रमांक नऊ मधील धर्मवीर आनंद दिघे मार्ग ते सावरकरनगर रस्ता काँक्रीटीकरण, टिटवाळा शाळाजवळ गटारे, ममता हँब ते केतकर बंगला पेव्हर रस्ता, पिंपळेश्वर मंदिर खडीकरण, तसेच प्रभाग क्रमांक दहा इंदिरानगर ते स्मशान परिसरात नवीन पाण्याचा लाईन टाकणे, गणेश मंदिर राधानगर परिसरात काँक्रीटीकरण रस्ता, रुंदा रोड ते स्वामी समर्थ मंदिरपर्यंत रस्ता, म्हसकळ रोड ठाकूर पाडा रस्ता बनविणे,डि जी इत्यादी विकास कांमासाठी आमदार निधी मंजूर करण्यात आला आहे.
आदिवासी पाडे मूलभूत सुविधेपासून वंचित
दरम्यान, कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रातील आमदार विश्वनाथ भोईर यांनी मन्याचा पाडा येथील रस्त्याच्या कामच्या उद्घाटनप्रसंगी भावुक होत स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या शहरामधील मन्याच्या पाड्यात अद्यापदेखील पथदिवे आणि पाणी सुविधेपासून वंचित आहे. ही दुर्दैवी बाब आहे. मन्याचा पाडा परिसराला लागून खासगी जमीन आहे. लगतच्या डीपी रस्त्याला हा परिसर जोडून कायापालट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मनपा क्षेत्रातील आदिवासी पाडे मूलभूत सुविधेपासून वंचित राहतात. पाणी, पथदिवे, रस्ता हा मूलभूत अधिकार त्यांना मिळालाच पाहिजे.
आमदार विश्वनाथ भोईर यांचे कौतुक
मन्याच्या पाडा टिटवाळा येथे सुमारे ५५ आदिवासी कुटुंबे राहत असून, स्वातंत्र्य दिनाच्या ७६ व्या महोत्सव वर्षातदेखील मनपा क्षेत्रातील आदिवासी पाडे पाणी, पथदिवे, रस्ता या सुविधेपासून वंचित आहेत. आमदार विश्वनाथ भोईर यांनी रस्त्यासाठी निधी देऊन पावसाळ्यात रुग्ण, गरोदरमाता यांना रुग्णालयात नेताना करावी लागणारा वनवास थांबवला आहे, असे स्थानिक मान्याच्या पाड्याचे रहिवासी चंद्रकांत धपाटे यांनी याप्रसंगी सांगत आमदार विश्वनाथ भोईर यांचे कौतुक करीत समस्त रहिवाशांतर्फे अभार मानले.
मूलभूत सुविधा मार्गी लावणार
शिवसेना शहर प्रमुख रवि पाटील यांनी मन्याचा पाडा आम्ही दत्तक घेणार असून पाणी, पथदिवे, रस्ता यासुविधांबाबत आयुक्तांचा दौरा काढून मार्गी कशा लागतील, असे आश्वासन दिले. प्रशासनाच्या लालफितीच्या कारभारच्या दुर्लक्षतेमुळे आदिवासी पाडे मनपा बजेटमध्ये तरतूद होत असतानादेखील विकासापासून दूर असल्याचे चित्र यानिमित्ताने दिसत आहे. कल्याण डोंबिवली मनपा आयुक्त डाँ. भाऊसाहेब दांगडे यांच्याशी संपर्क साधला असता मन्याच्या पाड्याबाबत माहिती घेऊन मुलभूत सुविधा मार्गी लावणार.