Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गावातील भूजल पातळीचा अभ्यास करण्याकरीता पिझोमीटर, भूजल मापक यंत्राचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

यामुळे गावाला भूजल पातळीची नोंद दर १२ तासाला घेता येईल, अशी सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच, या योजनेतंर्गत अमरावती जिल्ह्यातील एकूण ९० ग्रामपंचायत मध्ये ९० पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात येणार आहे. या यंत्राद्वारे गावामध्ये दरदिवशी किती पाऊस पडतो, मोजमाप कशाप्रकारे करतात, याचे प्रात्यक्षिक या कार्यालयमार्फत गावातील जलसुरक्षक यांना देण्यात येईल.

  • By Anjali Awari
Updated On: May 29, 2022 | 01:04 PM
Inauguration of Pizometer, Groundwater Gauge at the hands of Guardian Minister for studying ground water level in the village

Inauguration of Pizometer, Groundwater Gauge at the hands of Guardian Minister for studying ground water level in the village

Follow Us
Follow Us:

अमरावती : अटल भूजल योजनेतंर्गत वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत गावातील भूजल पातळीचा अभ्यास करण्यासाठी पिझोमीटर (भूजल मापक यंत्र) बसविण्यात आले आहे. महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी पिझोमीटरचे उद्घाटन करण्यात आले. सरपंच ललिता जोमदे, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे प्रादेशिक उपसंचालक संजय कराड, मोर्शीचे तहसीलदार सागर ढवळे, गटविकास अधिकारी आर. पवार, वरिष्ठ भूवैज्ञानिक हिमा जोशी आदी यावेळी उपस्थित होते.

९० ग्रामपंचायतीमध्ये भूजल सर्वेक्षण

अत्याधुनिक पध्दतीने गावातील भूजल पातळीच्या अभ्यास करण्याकरिता अमरावती जिल्ह्यामध्ये वरुड, मोर्शी  व चांदुरबाजार या तालुक्यात एकूण ९० ग्रामपंचायतीमध्ये भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत पिझोमीटरसाठी स्थळ निश्चित करण्यात आले आहे. जमिनीतील भूशास्त्रीय रचनेनुसार जलधारक खडकाचा तसेच भूजल पातळीचा अभ्यास अत्याधुनिक पध्दतीने करण्यासाठी पिझोमीटरने (भूजल मापक यंत्र) खोदकाम करण्यात येणार आहे. त्यावर (डिजीटल वॉटर लेवल रेकॉर्डर) बसविण्यात येणार आहे.

 भूजल पातळीची घेता येणार नोंद

यामुळे गावाला भूजल पातळीची नोंद दर १२ तासाला घेता येईल, अशी सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच, या योजनेतंर्गत अमरावती जिल्ह्यातील एकूण ९० ग्रामपंचायत मध्ये ९० पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात येणार आहे. या यंत्राद्वारे गावामध्ये दरदिवशी किती पाऊस पडतो, मोजमाप कशाप्रकारे करतात, याचे प्रात्यक्षिक या कार्यालयमार्फत गावातील जलसुरक्षक यांना देण्यात येईल. पर्जन्यमापक यंत्र व भूजल मापक यंत्राचा उपयोग करुन गावाचा ताळेबंद अधिक अचूकतेने करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.

Web Title: Inauguration of pizometer groundwater gauge at the hands of guardian minister for studying ground water level in the village nraa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2022 | 01:04 PM

Topics:  

  • adv yashomati thakuar
  • amaravati news

संबंधित बातम्या

Amaravati News: आश्रमशाळांना ‘वीज अरेस्टर’ कवच! संच बसविण्यासाठी ई-निविदेला मान्यता; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी निर्णय
1

Amaravati News: आश्रमशाळांना ‘वीज अरेस्टर’ कवच! संच बसविण्यासाठी ई-निविदेला मान्यता; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.