नागपूर हिवाळी अधिवेशनात आ राम सातपुते शेतकऱ्यांच्या दूधाला भाव वाढवून मिळावा यासाठी आक्रमक झालेले पाहायला मिळाले. खासगी दूधसंघांच्या एकाधिकारशाहीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. खाजगी दूधसंघ शेतकऱ्यांना लुबाडण्याचे काम करत आहेत.
अकलुज : नागपूर हिवाळी अधिवेशनात आरामसातपुतेशेतकऱ्यांच्या दूधाला भाववाढवून मिळावा यासाठी आक्रमक झालेले पाहायला मिळाले. खासगी दूधसंघांच्या एकाधिकारशाहीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. खाजगी दूधसंघ शेतकऱ्यांना लुबाडण्याचे काम करत आहेत. यावर चाप बसला पाहीजे, अशा लुबाडणाऱ्या खाजगी दूधसंघावर कारवाई करा अशी आक्रमक मागणी माळशिरसचे आरामसातपुते यांनी आज सभागृहात बोलताना सरकारकडे केली.
शेतीला जोडधंदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दूध व्यवसायासाठी शेतकरी पहाटे 4 वाजता उठून राबत असतो, जनावरांना लागणारी वैरण आणि पशूखाद्य यांची बेरीज केली आणि मिळणाऱ्या दुधाचा भाव पाहिला तर पाण्याच्या बाटलीचासुद्धा भाव जास्त होईल अशी परिस्थिती आहे, खाजगी दूधसंघ यामध्ये जबाबदार आहेत, त्यांच्या एकाधिकारशाहीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून यावर तातडीने मार्ग काढण्याची गरज आहे, शेतकरी जर समृद्ध करायचा असेल तर त्याच्या दूधाला रास्त भाव देण्याची गरज आहे, शेतकऱ्यांना लुटणाऱ्या दूधसंघावर कारवाई करा आणि शेतकऱ्यांना दुधालाभाववाढवूनद्या अशी मागणी आरामसातपुते यांनी सभागृहात बोलताना केली.
[blockquote content=”शेतीला जोड धंदा म्हणून दूध व्यवसायाकडे पाहिले जाते परंतु सतत वाढत जाणारे पशुखाद्याचे दर महागत जाणारा चारा आणि दुधाला मिळणारी किंमत याचा ताळमेळ लागत नाही यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था भीक नको पण कुत्र आवरा अशी परिस्थिती दूध उत्पादक शेतकऱ्यावर आली आहे मात्र नेमकं याच मुद्द्यावर माळशिरसचे आमदार राम सातपुते यांनी सभागृहाचे लक्ष वेधले याचा मनस्वी आनंद होत आहे सरकारने योग्य न्याय द्यावा हीच अपेक्षा ” pic=”” name=” -जयसिंगराव कदम ,दूध उत्पादक शेतकरी वेळापूर (शेरी)”]
Web Title: Increase the price of farmers milk ram satpute nrab