Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“विरोधकांकडे विकासाचा अजेंडा नाही त्यामुळेच ते,…”; रणजीत शिंदेंचे मतदारांना भावनिक आवाहन

जलसिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्याने मतदारसंघात चौफेर विकास झाला आहे ही वस्तुस्थिती असताना विरोधकांकडे विकासकामाचा कसलाही अजेंडा नसल्यामुळे ते नुसता खोटा प्रचार व जनतेची दिशाभूल करीत आहेत, असे शिंदे म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 15, 2024 | 03:07 PM
“विरोधकांकडे विकासाचा अजेंडा नाही त्यामुळेच ते,…”; रणजीत शिंदेंचे मतदारांना भावनिक आवाहन
Follow Us
Close
Follow Us:

टेंभूर्णी:  मागील 30 ते 35 वर्षांत आमदार बबनदादांनी केलेल्या विकासकामांच्या जोरावर मी सफरचंद या चिन्हावर अपक्ष निवडणूक लढवित आहे. मतदारसंघात भीमा-सीना जोडकालवा,सीना-माढा उपसासिंचन योजना कार्यान्वित केली,बार्शी उपसासिंचन योजनेतून माढा तालुक्यातील चार गावांना पाणी,साखर कारखाने उभे करून सातत्याने एफआरपी पेक्षा जास्त दर ऊसाला दिला,ठिकठिकाणी सबस्टेशन व नवीन ट्रान्सफॉर्मर बसवून वीजेचा प्रश्न सोडविला, कोट्यावधींच्या निधीतून रस्त्यांचे डांबरीकरण केले, शैक्षणिक व आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.विविध प्रकारचे समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत.

जलसिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्याने मतदारसंघात चौफेर विकास झाला आहे ही वस्तुस्थिती असताना विरोधकांकडे विकासकामाचा कसलाही अजेंडा नसल्यामुळे ते नुसता खोटा प्रचार व जनतेची दिशाभूल करीत आहेत. शासनाकडून तत्वतः अंतिम मंजुरी घेतलेली खैराव-मानेगाव उपसासिंचन योजना कार्यान्वित करण्यासाठी आणि भीमा व सीना नदीवर ठीकठिकाणी मोठे बॅरेजेस बांधण्यासाठी आमदारकीची संधी द्यावी असे आवाहन माढा विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार रणजीत बबनराव शिंदे यांनी मतदारांना केली आहे. ते वडशिंगे ता.माढा गुरुवारी 14 नोव्हेंबर रोजी प्रचारार्थ विराट जाहीर सभेत बोलत होते.

हेही वाचा: “माढा तालुक्याला कुणाची दृष्ट लागू देऊ नका”; मुलासाठी बबनराव शिंदेंकडून मतदारांना भावनिक साद

यावेळी शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा.शिवाजीराव सावंत यांनी सांगितले की,अपक्ष उमेदवार रणजीत शिंदे यांना आम्ही जाहीर पाठिंबा दिल्यापासून विरोधक हतबल व अस्वस्थ झाले आहेत.अनेकांना आपली राजकीय किंमत कमी होणार असल्याने मोठा धक्का बसला आहे.आम्ही तालुक्यातील दोन्ही बलाढ्य शक्ती एकत्र आल्याने विरोधी उमेदवार व विरोधकांची अक्षरशः झोप उडाली आहे. पक्षातील वरिष्ठ राजकीय नेतेमंडळींकडे आम्ही मागणी करुनही या निवडणुकीत न्याय न दिल्याने पुढील पिढीचे राजकीय भवितव्य अंधकारमय होऊ नये.बाहेरील विघातक शक्तीचे तालुक्यात राजकीय आक्रमण होऊ नये यासाठी मी विचारपूर्वक ठाम भूमिका घेतली आहे.रणजीत शिंदे हे विकासाची दृष्टी व नाविन्यपूर्ण उपक्रमाची व्हिजन असणारे उच्चविद्याविभूषित उमेदवार आहेत त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले.

हेही वाचा: “माढा तालुक्याला कुणाची दृष्ट लागू देऊ नका”; मुलासाठी बबनराव शिंदेंकडून मतदारांना भावनिक साद

यावेळी आमदार बबनराव शिंदे यांनी सांगितले की,विरोधी उमेदवारांकडे विकासाची कसलीही दृष्टी नाही.नुसती भ्रामक व नकारात्मक टीका करुन मते मागण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत.सध्या ते खोटेनाटे बोलून सर्वसामान्य जनता व शेतकऱ्यांची फसवणूक व दिशाभूल करीत आहेत. स्वतःला राज्याचे व जिल्ह्याचे नेते समजणा-यांना माळशिरस तालुक्यात आजतागायत एक एमआयडीसी सुरू करता आली नाही.माझ्या साखर कारखान्याप्रमाणे कधीही ऊसाला दर दिला नाही.याउलट मी माढा तालुक्यात तीन एमआयडीसी सुरू केल्या आहेत.ऊसाचे विक्रमी गाळप करून सातत्याने जिल्ह्यात सर्वाधिक दर दिला आहे.मी सुरू केलेल्या जलसिंचन योजनांमुळे तालुक्यात 40 लाख टन ऊसाचे उत्पादन झाले आहे.राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कार्यान्वित होताना मी ही सत्तेत होतो आणि पाठिंबा दिला होता हे लक्षात घेऊन मतदार भगिनींनी रणजीत शिंदे यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

Web Title: Independent candidate in madha ranjit shinde appeal to voters for victory in election 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2024 | 03:07 PM

Topics:  

  • Madha
  • Maharashtra Assembly Elecion 2024

संबंधित बातम्या

माढा हादरलं! जय मल्हार कला केंद्राबाहेर गोळीबार; अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ
1

माढा हादरलं! जय मल्हार कला केंद्राबाहेर गोळीबार; अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ

माढ्यात विवाहित महिलेची आत्महत्या; सासरच्या छळाला कंटाळून संपवलं जीवन
2

माढ्यात विवाहित महिलेची आत्महत्या; सासरच्या छळाला कंटाळून संपवलं जीवन

Crime News Updates : माढ्यात वाळू माफियांची गुंडगिरी, तहसीलदाराला मारण्याचा प्रयत्न
3

Crime News Updates : माढ्यात वाळू माफियांची गुंडगिरी, तहसीलदाराला मारण्याचा प्रयत्न

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विजयावर शंका नाही; हायकोर्टाने फेटाळली कॉँग्रेसची ‘ही’ याचिका
4

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विजयावर शंका नाही; हायकोर्टाने फेटाळली कॉँग्रेसची ‘ही’ याचिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.