Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Shahu Maharaj: छत्रपती घराण्याचा अपमान; खासदार शाहू महाराजांना निवासस्थानच नाही

एक वर्षापूर्वी देखील शाहू महाराजांनी या विषयी नाराजी व्यक्त केली होती. लोकसभा सदस्य कोणत्याही पक्षाचा असो त्याला केंद्र सरकारने सन्मानाची वागणूक दिली पाहिजे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Sep 29, 2025 | 01:40 PM
Chhatrapati Shahu Maharaj: छत्रपती घराण्याचा अपमान; खासदार शाहू महाराजांना निवासस्थानच नाही
Follow Us
Close
Follow Us:
  • खासदारांना दिल्लीत शासकीय निवासस्थान
  • खासदार छत्रपती शाहू महाराज दिल्लीत शासकीय निवासस्थान मिळाले नाही
  • खासदार छत्रपती शाहू महाराज यांना अद्याप दिल्लीत शासकीय निवासस्थान मिळालेले नाही.

Chhatrapati Shahu Maharaj: लोकसभा आणि राज्यसभेवर निवडून गेलेल्या खासदारांना दिल्लीत शासकीय निवासस्थान दिले जाते. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत 1922 मध्ये स्थिती संचालनालय या विभागामार्फत मंत्री आणि खासदारांना शासकीय बंगल्याचे वाटप केले जाते. हा विभाग निवास कायद्यातंर्गत बंगल्यांचे, फ्लॅटचे वाटप केले जाते. पण कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज यांना अद्याप दिल्लीत शासकीय निवासस्थान मिळालेले नाही. गेल्या दीड वर्षांपासून त्यांना महाराष्ट्र सदनातच राहण्याची वेळी आली आहे.

गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणूक 2024 मध्ये कोल्हापूर मतदारसंघातून शाहू महाराज विजयी झाले. त्यांनी खासदारकीची शपथ घेऊन आता दीड वर्ष झाले तरी त्यांना खासदार निवास मिळाले नसल्याने त्यांनी याविषयी जाहीर कार्यक्रमात खंत व्यक्त केली. मराठा महासंघाच्या कार्यक्रमात बोलताना खासदार शाहू महाराज छत्रपती म्हणाले, मी खासदार होऊन दीड वर्षे झाले. पण मला अजूनही दिल्लीत घर मिळालेले नाही. त्यामुळे गेल्या दीड वर्षांपासून मला महाराष्ट्र सदनातच राहावे लागत आहे.

India Rain Alert: महाराष्ट्रासह ‘या’ राज्यात वरुणराजा तांडव करणार; IMD च्या रेड अलर्टने थेट…

तसेच, मराठा समाज मागे पडत असून समाजाने शिक्षणाकडे जास्त लक्ष दिले पाहिजे, आणि मराा समााने स्वत:ही खंबीर राहणे महत्त्वाचे असल्याचे खासदार शाहु महाराजांनी म्हटले. यासोबतच राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबतची आपली भूमिका स्पष्टपणे मांडावी, असा टोलाही त्यांनी यावेळ लगावला. या कार्यक्रमाला राज्यसभेचे खासदार आणि भाजपचे नेते धनंजय महाडिक, शिवसेनेचे नेते आमदार चंद्रदीप नरके हे देखील उपस्थित होते. त्यांच्याच उपस्थित केंद्र सरकार बद्दल त्यांनी खंत व्यक्त केली आहे.

गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे पोलिसांचा नवा प्रयोग; ‘या’ टोळ्याकडून काळ्या पैशाचा हिशेब घेतला जाणार

दरम्यान एक वर्षापूर्वी देखील शाहू महाराजांनी या विषयी नाराजी व्यक्त केली होती. लोकसभा सदस्य कोणत्याही पक्षाचा असो त्याला केंद्र सरकारने सन्मानाची वागणूक दिली पाहिजे. दरम्यान, शाहु महाराजांना दिल्लीत खासदार निवासस्थान मिळत नसल्याने कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात देखील नाराजी व्यक्त केली जात आहे.

कोल्हापूर लोकसभेचा निकाल

कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत शाहू महाराज छत्रपती हे काँग्रेसचे उमेदवार होते. त्यांच्या विरोधात शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक उमेदवार होते. या निवडणुकीत तब्बल दीड लाखांच्या मताधिक्क्याने शाहू महाराज विजयी झाले होते. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला महाराष्ट्रात चांगले यश मिळाले होते.

 

Web Title: Insult to the chhatrapati family mp shahu maharaj does not even have a residence

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2025 | 01:40 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.