Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हगवणे कुटुंबामुळे IPS मामा पुन्हा अडचणीत? कारवाईची टांगती तलवार असताना घेतले माजी पुणे पोलीस आयुक्तांचे नाव

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. त्यांचा पदभार देखील कमी करण्यात असून शस्त्र परवानाबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.

  • By प्रीति माने
Updated On: May 30, 2025 | 01:05 PM
IPS officer Jalindar Supekar troubles increase as Shashank Hagawane gets arms license by using fake documents

IPS officer Jalindar Supekar troubles increase as Shashank Hagawane gets arms license by using fake documents

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये रोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. वैष्णवी हगवणे हिने सासरच्या जाचा कंटाळून आत्महत्या केली. तिला केलेली मारहाण, घरगुती हिंसाचार आणि हुंडा बळी ठरलेल्या वैष्णवीच्या सासरच्या विरोधात राज्य भरातून रोष व्यक्त केला जात आहे. हगवणे कुटुंबाला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून या प्रकरणाची सुनावणी सध्या पार पडत आहे. दरम्यान, वैष्णवीचा नवरा शशांक हगवणे याचा सख्खा मामा असलेले आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

हगवणे कुटुंबामध्ये तत्कालीन अतिरिक्त आयुक्त म्हणून काम पाहणारे आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्या नावाने धमकावले जात होते. या सर्व आरोपांचे जालिंदर सुपेकर यांनी यापूर्वीच खंडन केले आहे. त्यानंतर आता वैष्णवीचा नवरा शशांक हगवणे याच्याकडे शस्त्र आहे. तर हगवणे बंधुंकडे तीन शस्त्र आहेत. बनावट कागदपत्रांच्या आधारावर त्यांनी हे शस्त्रास्त्र परवाने मिळवले. हगवणे बंधुंच्या शस्त्रास्त्रांच्या फाईलवर आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर यांची सही आहे. त्यामुळे बडे अधिकारी असणारे जालिंदर सुपेकर यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हगवणे कुटुंबाकडे असलेल्या शस्त्रपरवानाबाबत मत व्यक्त केले आहे. तसेच हगवणे बंधुंच्या शस्त्रास्त्रांच्या फाईलवर आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर यांची सही आहे. याबाबत स्पष्टीकरण देताना तत्कालीन पुणे पोलीस आयुक्तांचे नाव घेत जालिंदर यांनी सर्व आरोप फेटाळले आहे. आयपीएस जालिंदर सुपेकर यांनी हगवणे बंधुंना शस्त्रास्त्र परवाना दिल्याच्या प्रकरणात आपण जबाबदार नसल्याचा सांगण्याचा प्रयत्न केला आहे. अमिताभ गुप्ता तत्कालीन पुणे पोलीस आयुक्त होते. त्यांच्या परवानगीनंतर आपण फाईलवर सही केली, असे मत आयपीएस जालिंदर सुपेकर यांनी व्यक्त केले आहे. याबाबत एका वाहिनीने वृत्त दिले आहे.

अमिताभ गुप्ता यांनी हगवणे बंधुंना शस्त्र परवाना दिला

मीडिया रिपोर्टनुसार, खोटे कागदपत्रे सादर केल्यानंतर देखील हगवणे बंधूंकडे शस्त्र परवाने देण्यात आले होते. या परवान्यावर जालिंदर सुपेकर यांची सही आहे. याबाबत सुपेकरांचे म्हणणं आहे की, पुणे पोलीस आयुक्तांनी परवानगी दिल्यानंतर मी सही केली. मी त्याला जबाबदार नाही, असं सांगण्याचा ते प्रयत्न करतायत. अमिताभ गुप्ता यांनी हगवणे बंधुंना शस्त्र परवाना दिला, असं ते अप्रत्यक्षपणे सांगत आहेत. हगवणे बंधुंनी 2022 साली पुणे पोलीस ग्रामीणकडे शस्त्रास्त्र परवान्यासाठी अर्ज केला होता. पण त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला होता.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा  

अतिरिक्त पदभार घेतला काढून

पिंपरी-चिंचवड येथील वैष्णवी कस्पटे-हगवणे आत्महत्या प्रकरणात विशेष पोलिस महानिरीक्षक (कारागृह सेवा सुधार विभाग, महाराष्ट्र) जालिंदर सुपेकर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यांच्यावर, हगवणे कुटुंबाला मदत केल्याचा आरोप झाला होता. या पार्श्वभूमीवर राज्याच्या गृह विभागाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, सुपेकर यांच्याकडून नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार काढून घेण्यात आला आहे.

Web Title: Ips officer jalindar supekar troubles increase as shashank hagawane gets arms license by using fake documents

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2025 | 01:05 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.