घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेनंतर कल्याण डोंबिवली मधील चौका चौकात रस्त्यालगत असलेल्या होर्डिंगचा आणि त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शिवसेना मनसे आमदारांनी या होर्डिंग बाबत आक्रमक भूमिका घेतली आहे .या पार्श्वभूमीवर कल्याण मधील सर्व होर्डिंगचे महापालिका आयुक्तांनी स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी करत कल्याणात अशी दुर्घटना घडल्यास आम्ही संबंधित अधिकाऱ्याला अजिबात माफ करणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिली आहे. तर मनसे आमदार राजू पाटील यांनी कल्याण डोंबिवली शहरांसह कल्याण शीळफाटा रोडवरील धोकादायक होर्डिंगचे स्ट्रक्चर ऑडिट करण्याची मागणी सातत्याने करतोय मात्र शासनाकडून दुर्लक्ष होतेय शासनाच्या आणि या होर्डिंग मालकांचे काही लागे बंधू आहेत का?असा सवाल प्रशासनाला विचारला आहे.
[read_also content=”शिंदे सेनेला पुण्यात मोठा धक्का! अनेक पदाधिकाऱ्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय? https://www.navarashtra.com/latest-news/pune-breaking-news-dispute-in-shivsena-shinde-group-many-officials-resign-from-party-after-eknath-shinde-nrpm-533294.html”]
घाटकोपर येथील दुर्घटना अतिशय दुर्दैवी असून ही नैसर्गिक आपत्ती नसून मानवनिर्मित दुर्घटना आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मालमत्ता विभागाने ज्या ज्या ठिकाणी भलीमोठी होर्डिंग उभारले आहेत, त्या प्रत्यक्ष स्थळावर जाऊन पाहणी करावी. त्यांची तपासणी करावी, तसेच ही महाकाय होर्डिंग अधिकृत आहेत की अनधिकृत याचाही तपास करून महापालिका प्रशासनाने अनधिकृत होर्डिंग उभारणार्यांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचनाही आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिल्या आहेत.तर केडीएमसी आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड या आयएएस अधिकारी असून त्यांचे इतर अधिकाऱ्यांवर वचक असणे आवश्यक आहे. कल्याणात उभारण्यात आलेल्या या भल्या मोठ्या होर्डिंगना कोणत्या आधारे आणि कोणत्या नियमानुसार परवानगी दिली याचा तपास करणे आवश्यक आहे.
[read_also content=”घोडा शर्यतीवेळी टांगा पलटी; अपघाताचा थरार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल https://www.navarashtra.com/viral/a-horse-overturned-during-a-race-the-thrilling-video-of-the-accident-went-viral-on-social-media-nrpm-533315.html”]
तसेच महापालिका आयुक्तांनी इथल्या होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट करून ते अधिकृत आहेत की अनधिकृत ते तपासावे, त्यात कोणताही गलथानपणा होणार नाही याची दक्षता घ्यावी,असेही आमदार विश्वनाथ भोईर यांनी स्पष्ट केले आहे. तर मनसे आमदार राजू पाटील यांनी गेली ३ -४ वर्ष ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील, कल्याण -डोंबिवली क्षेत्रातील आणि कल्याण शीळ फाटा रोडवरील धोकादायक होर्डिंग्सचे स्ट्रकचरल ऑडिट करण्याबाबत शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला पण अद्यापही कोणत्याच प्रकारची कारवाई यावर झालेली नाही . शासानचे आणि या होर्डिंग मालकांचे काही लागेबंधु आहेत का ? हा प्रश्न आता निर्माण होतोय. घाटकोपरच्या घटनेतून तरी कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेने कान टोचून या धोकायदायक होर्डिंग्सचे स्ट्रकचरल ऑडिट करून घ्यावे,अशी मागणी केली आहे