पंढरपुरात व्हीआयपी दर्शनासाठी वशिलेबाजी सुरूच
पंढरपूर : भारताची दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या व महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी संपूर्ण राज्यभरातून व परराज्यातून लाखो भाविक भक्त येत असतात. मात्र, इथे आल्यावर त्यांना चरण दर्शनासाठी तासनतास रांगेत उभे राहून दर्शन घ्यावे लागते. आपल्या लाडक्या देवाची भेट व्हावी, यासाठी भाविक विठुरायाचे चरण स्पर्श करून जातात.
दुसरीकडे, मंदिर समितीतील काही कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या मर्जीतील लोकांना काही मिनिटातच थेट दर्शनाचा लाभ होत असल्याची तक्रार होत आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी व्हीआयपी दर्शन बंद केल्याचे जाहीर केले होते. मात्र, काही कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या मर्जीने व्हीआयपी दर्शनाची सोय अद्यापही छुप्या पद्धतीने सुरू असल्याची चर्चा आहे. एकीकडे तासनतास रांगेत उभे राहून भाविक दर्शनाची वाट पाहत असले तरी वशिलेबाज लोकांमुळे सर्वसामान्य भाविकांना दर्शन मिळण्यात विलंब होत आहे.
मंदिर समितीच्या प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्यामुळे भाविकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. मात्र, दुसरीकडे मंदिर समितीतील काही कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या मर्जीतील लोकांना काही मिनिटातच थेट दर्शनाचा लाभ होत असल्याची तक्रार होत आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी व्हीआयपी दर्शन मर्जीने बंद केल्याचे जाहीर केले होते. मात्र, काही कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या व्हीआयपी दर्शनाची सोय अद्यापही छुप्या पद्धतीने सुरू असल्याची चर्चा आहे.
एकीकडे तासनतास रांगेत उभे राहून भाविक दर्शनाची वाट पाहत असले तरी वशिलेबाज लोकांमुळे सर्वसामान्य भाविकांना दर्शन मिळण्यात विलंब होत आहे. मंदिर समितीच्या प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्यामुळे भाविकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
रांगेतील भाविकांना त्रास
आषाढी यात्रा कालावधी संपताच मंदिर प्रशासनातील अधिकारी व मंदिर समितीचे कर्मचारी व मंदिर समितीचे सदस्य यांनी उत्तर द्वार लाडू प्रसादाजवळील दरवाजातून नेहमीप्रमाणे व्हीआयपी दर्शन चालू ठेवले आहे. या व्हीआयपी दर्शनामुळे पुन्हा दर्शन रांगेतील भाविकांना याचा त्रास होऊ लागला आहे. कारण व्हीआयपी दर्शनाला सभामंडपातून दररोज २०० ते ५०० व्हीआयपी भाविकांच्या एन्ट्री रजिस्टरला होत असून, हे व्हीआयपी गेस्ट सभा मंडपातून सोडले जात आहेत. त्यामुळे तासनतास दर्शन रांगेत उभा राहणाऱ्या भाविकांना यांचा त्रास सहन करावा लागत आहे.