पंढरपूर तालुक्यातील आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये महिलांसाठी ५० टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष महिला उमेदवारांची जुळवाजुळव करण्यात व्यस्त आहेत.
कार्तिकी यात्रेमध्ये वारकऱ्यांची संख्या खूपच कमी जाणवली. त्यामुळे एकंदरीतच व्यापारावर त्याचा मोठा परिणाम झाला. वारी फेल गेल्यामुळे स्थानिक व्यापारी मात्र चिंतेत होते.
कार्तिकी वारीत पोलीस प्रशासनाने वारकरी तसेच स्थानिक नागरिकांच्या सुरक्षा तसेच अतिक्रमण मोहिमेला प्राधान्य दिले असून, सुरक्षेसाठी व वाहतूक नियत्रंणासाठी 3 हजार 57 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
पंढरपूर तालुक्यातील सर्वच गावांमध्ये द्राक्ष छाटणीला जोर धरला होता. तयार झालेले पीक शेतातून सुरक्षित घरी आणण्यासाठी शेतकरी रात्रदिवस मेहनत घेत असताना अचानक कोसळलेल्या या अवकाळी पावसाने त्यांच्या कष्टावर पाणी फिरले.
राज्य निवडणूक आयोगाने अद्याप कोणताही निवडणूक कार्यक्रम जाहीर केला नसला तरी विविध पक्षांनी नगरपालिका निवडणुकाच आधी होणार हे गृहीत धरून तयारी सुरू केली आहे.
वाहनापासून उडणारा धुरळा आणि यापासून होणारे अनेक आजार याचा सामना पंढरपूरवासियांना करावा लागत आहे. या मार्गावर खड्डे व धुळीचे साम्राज्य जास्त असल्यामुळे वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
स्वस्त धान्य दुकानातील रेशन धान्याचा काळाबाजार होत असल्याचे बऱ्याच वेळा निदर्शनास आले आहे. शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी (दि. ३० सप्टेबर) धाड टाकत हा प्रकार उघडकीस आणला आहे.
कासेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व दौलतराव प्रशालेच्या बाजूला व प्रशालेच्या आतील मैदानावरही मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. तसेच शेतातही पाणी साचल्याने शेताला ही तळ्याचे स्वरूप आले आहे.
नवरात्र उत्सवाच्या पूर्वतयारीसाठी श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे पुरातन अलंकार गाठविण्याचे काम सुरू करण्यात आले असल्याचेही माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
भाजपने तालुक्यात नवी कार्यकारिणी जाहीर करून आपले संघटन पुन्हा मजबूत करण्याची मोहिम हाती घेतली आहे. प्रशांत परिचारक यांच्या भाजप पक्षप्रवेशाबाबत चर्चा सुरू असल्या तरी अद्याप अधिकृत घोषणा झाली नाही.
सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी व्हीआयपी दर्शन मर्जीने बंद केल्याचे जाहीर केले होते. मात्र, काही कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या व्हीआयपी दर्शनाची सोय अद्यापही छुप्या पद्धतीने सुरू असल्याची चर्चा आहे.
जिल्हा परिषद सोलापूर तथा जिल्हास्तरीय भरारी पथकाकडून धाड टाकून कारवाई केली. या कारवाईत लाखोंचा अवैध खतसाठा आढळून आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी दिली.
प्राथमिक आरोग्य केंद्रं आणि उपकेंद्रंही केवळ नावापुरती उघडी असून, डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी मुख्यालयी उपस्थित राहत नाहीत. परिणामी, सामान्य रुग्णांना खासगी रुग्णालयाचा मार्ग पत्करावा लागतो जे त्यांच्या आवाक्याबाहेरचे आहे
गेल्या १८ महिन्यांपासून डॉक्टर, मेडिकल ऑफिसर, औषध निर्माता, सेवक, परिचारिका, कर्मचारी यांची नेमणूक केली नसल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत धूळखात पडली आहे. वैद्यकीय अधिकारी गट-अ २ दोन पदे भरण्यात आली…