जे जे हॉस्टिपलच्या ऑर्थोपेडिक विभागाचा पुढाकार (फोटो सौजन्य - रूग्णालय)
मुंबई/नीता परब: राज्य सरकारच्या अंतर्गत येत असलेल्या भायखळा स्थित सर जेजे हॉस्पिटल १८० व्या वर्धापनदिनानिमित्त नवीन टप्पे गाठत आहे. या संदर्भात, रुग्णालयाच्या ऑर्थोपेडिक विभागाने अन्य सरकारी रुग्णालयांमधील ऑर्थोपेडिक सर्जन आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांना ऑर्थोपेडिक शस्त्रक्रियेतील नावीन्यपूर्ण तंत्रं शिकविण्यात येणार आहेत. याअंतर्गत, रुग्णालयात हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेशी संबंधित आधुनिक तंत्रांवर दोन दिवसांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
या कार्यशाळेत अमेरिकेतील डॉक्टर आधुनिक तंत्रांचा वापर करून थेट हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करणार आहेत. केवळ जेजे हॉस्पिटलच नाही तर राज्यातील अन्य १५ सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांचे सर्जन या थेट शस्त्रक्रियेच्या मदतीने शस्त्रक्रियेच्या आधुनिक तंत्रे शिकणार आहेत. पुढील पिढीतील डॉक्टरांना याचा अधिक फायदा मिळणार असल्याचे दिसून येत आहे.
ऑर्थोपेडिक विभागाचा पुढाकार
वैद्यकीय युगात नवीन तंत्रं उदयास येत आहेत. हीच तंत्र गुंतागुंतीशिवाय शस्त्रक्रिया सुलभ करत आहे. डॉक्टरांना शस्त्रक्रियेच्या या आधुनिक तंत्रांचे ज्ञान देण्यासाठी जेजे हॉस्पिटलच्या ऑर्थोपेडिक विभागाने पुढाकार घेतला आहे. याअंतर्गत, जेजे रुग्णालयाचे डीन डॉ. अजय भंडारवार यांच्या मार्गदर्शनाखाली, रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संजय सुरासे आणि ऑर्थोपेडिक विभागाचे प्रमुख डॉ. नादिर शाह यांच्या नेतृत्वाखाली २१ आणि २२ जुलै रोजी विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत. आधुनिक तंत्रांनी हिप रिप्लेसमेंट सर्जरी कशी करावी यासाठी यूएसचे डॉकटर धडे देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
सावध राहा! समाजमाध्यमांवरील ‘या’ मेसेजपासून सावधान, जे जे रुग्णालय प्रशासनाकडून जनतेला आवाहन
ऑर्थोपेडिक विभागाचे तज्ज्ञ काय म्हणाले?
डॉ. नादिर शाह म्हणाले की, जुन्या पद्धतीनुसार, हिप रिप्लेसमेंट सर्जरी मागच्या किंवा नितंबांमधून केली जात होती जी रुग्णांसाठी कधी कधी धोकादायक होती परंतु आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ती केली जाते. यांमुळे जलद प्रकृतीत सुधारणा या व्यतिरिक्त, कमी चीरा यामुळे रुग्ण लवकरात लवकर बरा होतो. ऑर्थोपेडिक सर्जन आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांना त्याच नव्यातंत्राने शस्त्रक्रिया कशी करावी हे शिकवले जाणार आहे.
US डॉक्टर देणार आधुनिक तंत्रज्ञानयुक्त ज्ञान
डॉ. नादिर शहा यांनी पुढे सांगितले की, अमेरिका स्थित डॉ. शिराज पटेल शस्त्रक्रिया करून डॉक्टरांना थेट लाईव्ह प्रशिक्षण देतील. यात अत्याधुनिक शस्त्रक्रियेच्या प्रात्यक्षिकाद्वारे माहिती देणार आहेत. नवे व स्नायू वाचवणारी प्रगत तंत्र यामध्ये समाविष्ट आहेत ज्याने जगभरात हिप रिप्लेसमेंटचे परिणाम बदलले आहेत. या कार्यशाळेचे नेतृत्व वरीष्ठ निवासी डॉ. रजत शेट्टी आणि डॉ. प्रियांका मीना यांच्यासोबत डॉ. कुशल गोहिल आणि डॉ. संतोष घोटी या वरीष्ठ डॉक्टरांचा महत्वपूर्ण सहभाग असणार आहे. यामुळे वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही नक्कीच लाभ मिळणार आहे आणि पुढील पिढीसाठी हे नक्कीच फायदेशीर ठरेल.
जे. जे. हॉस्पिटलमध्ये लवकरच सुरु होणार स्मार्ट ओपीडी