Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 10 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon E-Bus Service: दिवाळीनंतर शहरात धावणार ई-बसेस! आगाराचे काम पूर्ण, अग्निशमन प्रतिबंधाचे कार्य लवकरच

Jalgaon E-Bus Service: जळगाव शहरातील नागरिकांसाठी दिवाळीनंतर पीएम ई-बससेवा सुरू होणार आहे. केंद्र सरकारच्या १०० टक्के निधीतून ही बससेवा राबविण्यात येत असून, महापालिकेवर कोणताही आर्थिक भार पडणार नाही.

  • By Riddhi Vanne
Updated On: Nov 10, 2026 | 06:38 PM
Jalgaon E-Bus Service: (फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Jalgaon E-Bus Service: (फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • दिवाळीनंतर जळगावात पीएम ई-बससेवा सुरू होणार.
  • शहरासाठी ५० वातानुकूलित ई-बसेस मंजूर.
  • मेहरूणमध्ये आगार आणि चार्जिंग स्टेशनचे काम पूर्ण.

जळगाव (वा.) शहरातील नागरिकांना वाहतूक सेवेच्या सुविधा निर्माण व्हाव्यात, यासाठी केंद्र शासनाच्या शंभर टक्के निधीतून पी.एम.ई. बससेवा महापालिका क्षेत्रात राबविण्यात येत आहे. त्याच अंतर्गत जळगावात ही सेवा दिवाळीनंतर सुरू होणार आहे. महापालिकेने आगार उभारणीसह सर्व प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. राज्यात सर्व महापालिका क्षेत्रांत केंद्राच्या पी.एम.ई. बसेस सुरू होत आहेत. सोलापूर, ठाणे, पुणे येथे ही सेवा सुरू करण्यात आलेली आहे. आता जळगाव, अहिल्यानगर, कोल्हापूर, मालेगाव येथे ही सेवा सुरू होत आहे. महापालिकेच्या माध्यमातून ही बससेवा सुरू करण्यात येणार आहे, मात्र महापालिकेवर त्याचा कोणताही भार पडणार नाही.  Jalgaon E-Bus Service:

आगार उभारणी पूर्ण

जळगाव महापालिकेतर्फे मेहरूण शिवारातील जुन्या टी. बी. हॉस्पिटलच्या दोन एकर जागेत ई-बससेवेचा हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. या ठिकाणी आगार उभारणीचे काम पूर्ण करण्यात आलेले आहे. ई-बसेससाठी चार्जिंग स्टेशन तयार करण्यात आलेले आहे.

फायर स्टेशनचे काम लवकरच पूर्णत्वास येणार

अग्निशमन केंद्रांचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती मनपातर्फे देण्यात आली आहे. स्थायी समिती सभेने त्याला नुकतीच मंजुरी दिलेली असून, त्याचेही काम लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. महापालिकेने आगार उभारणीचे काम पूर्ण केलेले आहे. तसेच बसेसचे मार्ग, थांबे याबाबतही आखणी करण्यात आली आहे. तर चालक व वाहक भरण्यासाठी निविदा काढून कंपनी नियुक्त करण्यात आलेली आहे. आता केवळ केंद्रीय पाहणी पथकाची प्रतीक्षा आहे, त्यांनी पाहणी केल्यानंतर ते हिरवा कंदील देतील. दिवाळीनंतर या बसेस जळगावच्या रस्त्यावर प्रवाशांच्या सेवेसाठी धावणार आहेत.

Machal Village: मिनी महाबळेश्वरमध्ये पहिल्यांदाच एसटी धावली! ७८ वर्षांचं स्वप्न अखेर पूर्ण

शहरासाठी यापूर्वीच ५० बसेस मंजूर

जळगाव शहरासाठी ५० ई-बसेस मंजूर करण्यात आलेल्या आहेत, त्यात २४ मोठ्या, सहा मध्यम व २० मिनी बसेस असणार आहेत. या सर्व बसेस वातानुकूलित असणार आहेत. या बसेस लवकरच जळगावला प्राप्त होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Jalgaon News: ना बंगला, ना झगमगाट… पालकमंत्र्यांनी साजरी केली …

फायर स्टेशनचे काम लवकरच पूर्णत्वास येणार

अग्निशमन केंद्रांचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती मनपातर्फे देण्यात आली आहे. स्थायी समिती सभेने त्याला नुकतीच मंजुरी दिलेली असून, त्याचेही काम लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. महापालिकेने आगार उभारणीचे काम पूर्ण केलेले आहे. तसेच बसेसचे मार्ग, थांचे याबाबतही आखणी करण्यात आली आहे, तर चालक व वाहक भरण्यासाठी निविदा काढून कंपनी नियुक्त करण्यात आलेली आहे. आता केवळ केंद्रीय पाहणी पथकाची प्रतीक्षा आहे. त्यांनी पाहणी केल्यानंतर ते हिरवा कंदील देतील. दिवाळीनंतर या बसेस जळगावच्या रस्त्यावर प्रवाशांच्या सेवेसाठी धावणार आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: जळगावमध्ये ई-बससेवा कधी सुरू होणार आहे?

    Ans: दिवाळीनंतर जळगाव शहरात पीएम ई-बससेवा सुरू होण्याची अपेक्षा आहे.

  • Que: जळगाव शहरासाठी किती ई-बसेस मंजूर झाल्या आहेत?

    Ans: जळगाव शहरासाठी एकूण ५० ई-बसेस मंजूर करण्यात आल्या आहेत.

  • Que: जळगावमध्ये किती प्रकारच्या ई-बसेस धावणार आहेत?

    Ans: यामध्ये २४ मोठ्या, ६ मध्यम आणि २० मिनी बसेस असणार आहेत.

Web Title: Jalgaon pm e bus service 50 electric buses after diwalirv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2026 | 06:38 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.