जालना : महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाची माहिती दिली आहे.
आरोग्य विभागाच्या पेपरफुटी नंतर भरती प्रक्रियेसाठी नव्या पद्धतीने परीक्षा घेण्याचा सरकारचा निर्णय आहे. अशी माहिती टोपे यांनी दिली. यावर पोलिसांचा स्पष्ट अहवाल आल्यानंतर त्यावर त्वरित निर्णय घेतला जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. ते जालना येथे पत्रकारांशी बोलत होते. पोलिसांचा रिपोर्ट आल्यावरच या संदर्भात निर्णय होणार असे आरोग्यमंत्री म्हणाले.
[read_also content=”गरीब पाकिस्तानचे अब्जाधीश अधिकारी, लष्कराच्या जनरलांनी अब्जावधी डॉलर्स स्विस बँकेत ठेवले; अहवालात खुलासा https://www.navarashtra.com/world/pauper-pakistans-billionaire-officer-army-generals-kept-billions-of-dollars-in-swiss-bank-disclosed-in-the-report-242691.html”]
पेपर फुटीप्रकरणी पोलिसांचा अहवाल लवकर यावा यासाठी गृहमंत्री व पुणे पोलीस आयुक्तांना याबाबत सांगितल्याचे देखील आरोग्यमंत्री म्हणालेत. पोलिसांनी स्पष्ट अहवाल देण्यासाठी गृहमंत्र्यांना विनंती करण्यात आल्याचं टोपे यावेळी म्हणाले.