Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jitendra Awhad on Tuljabhavani Mandir: तुळजाभवानी मंदिराचा गाभारा पाडण्याचा डाव कुणाचा…?; आव्हाडांचा गौप्यस्फोट

मंदिराच्या शुशोभिकरणाला, त्याच्या डागडुजीला आमचा विरोध नाही, पण गाभारा पाडण्याला आमचा विरोध आहे. येथील स्थानिकांच्या जनभावनाही तीव्र आहेत. देवीने काही मला स्वप्नात येऊन सांगितलेले नाही.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 13, 2025 | 10:24 AM
Jitendra Awhad on Tuljabhavani Mandir: तुळजाभवानी मंदिराचा गाभारा पाडण्याचा डाव कुणाचा…?; आव्हाडांचा गौप्यस्फोट
Follow Us
Close
Follow Us:
  • तुळजाभवानी मंदिरात जितेंद्र आव्हाडांचे दर्शन
  • देवीच्या मंदिराचा गाभारा पाडण्याचा राज्य सरकारचा डाव- जितेंद्र आव्हाडांचा आरोप
  • मंदिराच्या गाभाराऱ्याला हात लावू देणार नाही. आव्हाडांचा इशारा

Jitendra Awhad on Tuljabhavani Mandir: संपूर्ण महाराष्ट्राचं नवे तर परदेशात राहणाऱ्या लाखो मराठी लोकांचही कुळदैवत असलेल्या तुळजाभवानी मंदिराबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्यातील फडणवीस सरकार तुळजाभवानी मातेच्या मंदिराचा गाभारा पाडण्याच्या बेतात असल्यचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांमुळे खळबळ उडाली असून, त्यावरून नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. मंगळवारी जितेंद्र आव्हाड यांनी तुळजाभवानी मातेच्या मंदिराला भेट दिली. देवीचे दर्शनही घेतले.

यादरम्यान त्यांनी मंदिर संस्थानाकडून सुरू असलेल्या गाभारा दुरुस्ती आणि विकास कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी, मंदिर संस्थानाकडून सुरू असलेल्या विकासकामाला माझा विरोध नाही. पण गरज नसताना देवीच्या गाभाऱ्याची मोडतोड का केली जातेय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच, ‘मी सनातन हिंदू नसलो, तरी हिंदू असून राज्य सरकारला देवीच्या मंदिराच्या दगडालाही हात लावून देणार नाही,’ असा इशाराही आव्हाड यांनी यावेळी दिला. याचवेळी त्यांनी एक ट्विटर एक्सवर पोस्ट करत लक्षही वेधले आहे.

Sharad Pawar News: पडळकरांना भिडला, तुरूंगात गेला….; शरद पवारांनी त्यालाच दिली मोठी जबाबदारी

काय म्हटलं आहे जितेंद्र आव्हाडांनी ?

“तुळजापूर येथील आई तुळजाभवानी मातेच्या मंदिराचा गाभारा पाडण्याच्या बेतात हे राज्य सरकार आहे.हा आमच्या संस्कृतीवर आणि आमच्या श्रद्धेवर घाला आहे.छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे मंदिर,नुसते मंदिर नसून लाखो करोडो भक्तांच्या आस्थेचे प्रतीक आहे. याविरोधात आज तुळजापूर येथे मंदिराला भेट देऊन भाविकांच्या याबाबत जनजागृती केली….सोबतच आई तुळजाभवानी मातेचे दर्शन देखील घेतले..!” असे जितेद्र आव्हाड यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

पण जे ऐतिहासिक संदर्भ असलेले दगड आहेत. ते फक्त दगड नाहीत महाराष्ट्राचा इतिहास आहे.  ज्या दगडांनी  छत्रपती शिवाजी महाराजांना पाहिलं, ज्या  दगडांनी अहिल्याबाई होळकरांना पाहिलं, त्या दगडांना हलणारे हे कोण लागून गेले. ज्या दगडी पायऱ्यांनी शिवाजी महाराज चढले-उतरले ते दगड पाडून टाकायचे. ते आम्हाला मान्य नाही. उद्या म्हणतील रायगडपण हलवा.  रायगड हे आमचे श्रद्धास्थान  आहे.

मंदिराच्या शुशोभिकरणाला, त्याच्या डागडुजीला आमचा विरोध नाही, पण गाभारा पाडण्याला आमचा विरोध आहे. येथील स्थानिकांच्या जनभावनाही तीव्र आहेत. देवीने काही मला स्वप्नात येऊन सांगितलेले नाही. मला इथल्या स्थानिकांचे काही पुजाऱ्यांचेही फोन आलेत. मी एकाही पुजाऱ्याशी बोललेलो नाही. त्यांना विचारून मी भूमिका घेतलेली नाही.  तुम्हाला जे काही करायचं ते करा, पण देवीच्या गाभाऱ्याला हात लावायचा नाही. गाभाऱ्याला ऐतिहासिक, पौराणिक, श्रद्धेचा संबंध आहे. हजारो भक्तांची माथी तिथे टेकलेली आहेत. तो प्रत्येक दगड पुजनीय आहे, त्या पुजनीय दगडाला हात लावायचा नाही.” असही आव्हाड यांनी म्हटलं आहे.

प्रियकराला कर्जमुक्त करण्यासाठी प्रेयसीने चोरले आईचे दागिने; ११ तोळे दागिन्यांसह दीड लाख केले लंपास

याशिवाय त्यांनी आणखी एक पोस्ट केली आहे. त्यातही त्यांनी मंदिरासंबंधीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “इतिहासाचा खून – तोही आपल्या डोळ्यांदेखत!” तुळजापूरचं तुळजाभवानी मंदिर — हजारो वर्षांची परंपरा, शेकडो वर्षांचा इतिहास, आणि लाखो लोकांचा विश्वास. पहिली रचना – अंदाजे आठव्या ते दहाव्या शतकात. त्या काळातील पायऱ्या आजही इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांनी येथे येऊन तुळजाभवानीचे आशीर्वाद घेतले आणि रयतेच्या राज्याची पायाभरणी केली. अहिल्याबाई होळकरांनी मंदिर परिसरात विहीर बांधली, जी आजही अस्तित्वात आहे.

पण आता…
“विकास” या नावाखाली हाच वारसा पाडून टाकण्याचा प्रयोग सुरू आहे!
इतिहास मोडून टाकून मंदिर नवं होईल, पण त्या दगडात कोरलेल्या आठवणींचं काय होणार?

विकास म्हणजे वारसा संपवणं नाही!
छत्रपतींच्या पाऊलखुणा पुसणं हे प्रगती नव्हे – ती संस्कृतीवरची तोडफोड आहे!
आपल्या मुलांना इतिहास दाखवायचा की फक्त त्याचा फोटो?

उद्या कदाचित सांगावं लागेल –
“इथे कधी काळी तुळजाभवानीचं जुना मंदिर होतं… मग कुणीतरी त्याला ‘अपग्रेड’ केलं!”

 

Web Title: Jitendra awhad on tuljabhavani mandir whose plan is it to demolish the grandeur of tuljabhavani temple awhads revelation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2025 | 10:23 AM

Topics:  

  • Jitendra Awhad

संबंधित बातम्या

Jitendra Awhad News: राजीव कुमार निवडणूक आयुक्त झाले आणि त्यांनी निवडणुकांची वाट लावली…; जितेंद्र आव्हाडांनी तोफ डागली
1

Jitendra Awhad News: राजीव कुमार निवडणूक आयुक्त झाले आणि त्यांनी निवडणुकांची वाट लावली…; जितेंद्र आव्हाडांनी तोफ डागली

Thane News : निवडणूक आयोगाच्या बोधचिन्हाची होळी…, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची आक्रमक भूमिका
2

Thane News : निवडणूक आयोगाच्या बोधचिन्हाची होळी…, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची आक्रमक भूमिका

Jitendra Awhad News: शिरसाट, कोकाटेंनंतर आता जितेंद्र आव्हाडांचे वादग्रस्त विधान; सनातन धर्म नावाचा कोणताही धर्म नव्हता….’
3

Jitendra Awhad News: शिरसाट, कोकाटेंनंतर आता जितेंद्र आव्हाडांचे वादग्रस्त विधान; सनातन धर्म नावाचा कोणताही धर्म नव्हता….’

एकेकाळी विधिमंडळात शिस्त होती, पण आता…; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
4

एकेकाळी विधिमंडळात शिस्त होती, पण आता…; छगन भुजबळ स्पष्टच बोलले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.