Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कसारा घाट रस्ता अपघातप्रवण; रस्ता दुभाजक बसवण्याची स्थानिकांची मागणी

मुंबई-नाशिक महामार्गावरील कसारा घाटातील रस्ता अपघातप्रवण असून, रस्ता दुभाजक बसवून दुर्घटना टाळण्याची प्रवाशांची मागणी आहे. संबंधित विभागाचे दुर्लक्ष व वाहनांच्या वेगाने समस्या गंभीर होत आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jan 01, 2025 | 04:43 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

दीपक गायकवाड – मोखाडा : मुंबई नाशिक दृतगती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 हा कसारा घाटातून मार्गस्थ होणारा राष्ट्रीय महामार्ग मोखाडा तालुक्यातून मुंबई कडे प्रस्तान करणाऱ्या शेकडो वाहनांसाठी धोकादायक ठरत आहे. या ठिकाणी मागील पाच वर्षात असंख्य अपघात घडले असून अनेकांना आपले जीव गमवावे लागलेले आहेत. याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाने तातडीने जरूर ती उपाय योजना करण्याची मागणी मोखाडा तालुक्यातील प्रवाशांनी केली आहे.

Crime News: बनावट कंपन्या स्थापन करून बुडविला तब्बल ४९६ कोटींचा जीएसटी; ‘DGGI’ तर्फे तक्रार, गुन्हा दाखल

मुंबई नाशिक दृतगती राष्ट्रीय महामार्ग हा कसारा घाटातून जाणारा एकेरी महामार्ग आहे या मार्गांवरून मोखाडा, खोडाळा येथून ठाणे, मुंबई येथे कार्यालयीन व दवाखाण्याच्या कामासाठी जाणाऱ्या खाजगी व परिवहन महामंडळाच्या प्रवाशी वाहनांसाठी (विहीगाव) जव्हार फाटा ते लतीफवाडी पर्यंतचा चार किलोमीटरचा मार्ग हा अत्यंत धोकादायक झालेला आहे. मुंबईकडून येणारी वाहनेही सदरचा मार्ग हा एकेरी असल्याने भरधाव वेगाने मार्गक्रमन करतात. त्यातच मुंबईकडून नाशिककडे प्रयाण करणारी अवजड वाहनेही शेजारून जाणाऱ्या वाहनांना वळसा घालून पुढे त्याच वेगाने जात असल्याने विहिगाव फाट्यावरून कसाऱ्याकडे (समोरून) धावणारी वाहनेही जात असल्याने त्या वाहणांना मोठ्या प्रमाणावर अपघात होऊन जीवित हानी घडणाऱ्या घटना घडत आलेल्या आहेत. पर्यायाने याठिकाणी पर्यायी उपाय योजना करण्याची निकड असताना देखील संबंधित विभाग त्याकडे सोईस्करपने दुर्लक्ष करीत आहे.

“दुभाजक टाकण्याची मागणी”

(विहिगाव )जव्हार फाटा ते लतीफवाडी दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गांवर मोखाडा खोडाळा येथून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांसाठी तात्पुरती व्यवस्था म्हणून रस्ता दुभाजक टाकल्यास सदरील वाहणांना सोईचे होणार असून संभाव्य दुर्घटना टाळता येऊ शकते. रस्ता दुभाजकाला तितकासा खर्चही येणार नसल्याने या पर्यायी व्यवस्थेचा तातडीने विचार करून अवलंब करण्याची मागणी प्रवाशी हितवर्धक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब मुळे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ठाणे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक ठाणे यांच्याकडे संयुक्त निवेदनाद्वारे केली आहे.

Shirur News: शिरुरचे वीस सहाय्यक निरीक्षक नाशिकच्या दिक्षांत समारंभात

“सूचना फलकांचा बागुलबुवा “

मुंबई नाशिक राष्ट्रीय दृतगती महामार्गावर लतीफवाडी ते जव्हारफाटा दरम्यान ठिकठिकाणी “समोरून मुंबई कडे जाणारी वाहने येत असल्याने वाहने हळू चालवा”असे मार्गदर्शक सूचना फलक लावण्यात आलेले आहेत.मात्र मुंबईकडून येणाऱ्या वाहनांकडून कोणतीही अंमल बजावणी होताना दिसत नाही.उलटपक्षी मुंबईकडून येणारी वाहने प्रस्तुत सूचना फलकांकडे सोईस्करपने डोळेझाक करून पुढे जात असल्याने हे मार्गदर्शक सूचना फलक केवळ बागुलबुवा ठरलेले आहेत. त्यामुळे स्थानिक पोलीस प्रशासनाने देखील त्याबाबत खबरदारी घेण्याची गरज निर्माण झालेली आहे.

Web Title: Kasara ghat road is accident prone

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 01, 2025 | 04:43 PM

Topics:  

  • kasara ghat

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.