Photo Credit- team navrashtra शिरुरचे वीस सहाय्यक निरीक्षक नाशिकच्या दिक्षांत समारंभात
शिक्रापूर: शिरुर तालुक्यात एकाच शाळेतील पन्नासच्या संख्येने शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा व राज्य गुणवत्ता यादीत चमकण्याची अभूतपूर्व परंपरा शिरुरकरांनी अनेक वर्षांपासून कायम ठेवली. नुकतेच शिरुर तालुक्यातून सहाय्यक पोलीस निरीक्षक झालेल्या अधिकाऱ्यांचा दिक्षांत समारंभात नाशिकमध्ये पार पडला. शिरुर तालुक्यातील वीस अधिकाऱ्यांनी एकाच वेळी दिक्षांत समारंभात सहभाग घेत शिरुर तालुक्याचे नाव उंचावले आहे.
महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी 2020 च्या एमपीएससीच्या परीक्षेत फौजदार परीक्षेत यशस्वी झालेल्या तब्बल 620 जणांचे 13 महिन्यांचे प्रशिक्षण नाशिक येथे पूर्ण होऊन सर्वांचा दिक्षांत समारंभात नाशिक पोलिस अॅकेडमीचे मुख्य संचालक तथा अतिरिक्त पोलिस महासंचालक राजेशकुमार मोर यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी राज्याच्या इतिहासात प्रथमच एकाच तालुक्यातील वीस सहाय्यक पोलीस निरीक्षक झाल्याचा प्रसंग समोर आल्याने शिरुरचा डंका कसा असतो त्याची प्रचिती नागरिकांना आली.
Bigg Boss 18: मुलीशिवाय या तिघांना टॉप तीनमध्ये पाहते ईशाची आई? म्हणाल्या
वीस शेतकरी कुटुंबातील शिरुरकरांनी आपल्या आई वडीलांसमवेत अधिकारी म्हणून खाकी वर्दीची शपथ घेतली. नाशिक पोलिस अॅतकेडमीचे मुख्य संचालक तथा अतिरिक्त पोलिस महासंचालक राजेशकुमार मोर व नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्रीचंद दौलतराम जगमलानी यांनी सर्व शिरुरकरांना शपथ दिली आणि सर्वांनी आपापल्या आई वडीलांसमवेत हा आनंदसोहळा मोठ्या उत्साहासह भावूक होवून साजरा केला.
अतुल नरसिंग पवार (जातेगाव बुद्रुक, नागपूर), जयराम सोमनाथ देशमुख (कुरुळी, नागपूर),
आकाश पिराजी साकोरे (केंदुर, नागपूर), सुप्रिया धनंजय गजरे (करंदी, नागपूर),
अनिरुद्ध राहुल गवारे (विठ्ठलवाडी, सांगली), विशाल रंगनाथ नवगिरे (पिंपळे खालसा, अमरावती),
अमर शामराव तिखे (वाजेवाडी, मुंबई), सौरभ गोरक्षनाथ दसगुडे (रामलिंग, मुंबई),
माओवाद्यांचा बालेकिल्ला भेदला! स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा ‘या’ भागात धावली लाल परी
स्वप्नील यशवंत साठे (तर्डोबाची वाडी, मुंबई), आदिती गंगाराम भोसले (आपटी, मुंबई),
अक्षय धनंजय थोपटे (चिंचोली मोराची, नागपूर), ऋषिकेश बाळासाहेब लांघे (कान्हूर मेसाई, मुंबई),
अक्षय पोपट ढोरमले (अण्णापुर, नागपूर), सागर मोहन चव्हाण (वडगाव रासाई, गडचिरोली),
विक्रांत अशोक तळोले (कान्हूर मेसाई, गडचिरोली), रेश्मा शिवाजी गुंजाळ (आलेगाव पागा, मुंबई),
विनोद हरिभाऊ आफळे (उरळगाव, मुंबई), अविनाश बाळासाहेब शिवले (वढू बुद्रुक, मुंबई),
अमित रामदास तळोले (कान्हूर मेसाई, बुलढाणा), प्रज्ञा जनार्दन गायकवाड (शिरसगाव काटा, मुंबई).