मुंबई : भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा मुख्यमंत्र्यांविरोधात दंड थोपटले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंच्या नावे मुरुड तालुक्यातील कोर्लई गावात 19 बंगले असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. या गैरव्यवहार प्रकरणी सोमय्या यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे(Kirit Somaiya will go to the High Court against Chief Minister Uddhav Thackeray).
मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत रश्मी ठाकरे यांच्या नावावर असणाऱ्या 9 एकर जमिनीवरील 19 बंगले गायब केल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. याप्रकरणी ते मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करणार आहेत. किरीट सोमय्यांमी बुधवारी अलिबाग येथे अॅड. अंकित बंगेरा याच्या निवासस्थानी दहा वकिलांसह याचिकेबाबत चर्चा केली. सोमय्या यांनी उचललेल्या या पावलामुळे ठाकरे कुटुंबाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
किरीट सोमय्या यांनी बुधवारी कोर्लई येथील मुख्यमंत्र्यांच्या कथित बंगल्याबाबतची कागदपत्रे वकिलांना दिली. तसेच पहिल्या ड्राफ्टवर चर्चा केली. वकिलांकडून आलेले सल्ले लक्षात घेऊन, येत्या आठ ते दहा दिवसांत यावर अंतिम ड्राफ्ट तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर सोमय्या मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करतील. त्यामुळे या कथित गैरव्यवहाराची खरी वस्तुस्थिती न्यायालायमार्फत जनतेसमोर येणार आहे, अशी प्रतिक्रिया सोमय्या यांचे वकील अॅड. किरण कोसमकर यांनी दिली.
[read_also content=”घरात-दुकानात, वाहनांना ‘लिंबू-मिरची’च का बांधतात? अध्यात्म आणि विज्ञान काय सांगते? https://www.navarashtra.com/religion/religion/nimbu-mirchi-totka-nrvk-257586.html”]
[read_also content=”येथे लग्नानंतर नविन नवरा-नवरीच्या प्रायव्हेट पार्टची पूजा करतात; पूजेच्या नावावर होतात वधू-वरावर अत्याचार https://www.navarashtra.com/viral/here-after-the-wedding-the-newlyweds-worship-the-private-part-of-the-bride-the-bride-and-groom-are-tortured-in-the-name-of-worship-256616.html”]
[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]
[read_also content=”भारतात सर्वात प्रथम ‘या’ गावावर पडतात पहिली सूर्यकिरणे! पहाटे 3 वाजता डोंगरावर सूर्य उगवतो; दुपारी चार वाजताच पडतो अंधार https://www.navarashtra.com/travel/travel/dong-valley-the-land-of-indias-first-sunlight-nrvk-248724.html”]