"...तर मतांचं धर्मयुद्ध करावचं लागेल"; फडणवीसांचं जनतेला विरोधकांचे नापाक इरादे गाडून टाकण्याचं आवाहन
इचलकरंजी: राज्यात विधानसभा निवडणूक अगदी शेवटच्या टप्यात येऊन पोहोचली आहे. २० तारखेला मतदान होणार आहे. तर २३ तारखेला मतमोजणी होणार आहे. विधानसभेसाठी सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीच्या स्टार प्रचारकांनी राज्यभर अनेक सभा घेतल्या. आता मतदार कोणाला साथ देणार हे २३ तारखेला पहावे लागेल. दरम्यान आज महायुतीचे इचलकरंजीचे उमेदवार राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारसभा घेतली. यावेळेस त्यांनी लखपती दिदी आणि अनेक विषयांवर भाष्य केले आहे.
राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आल्यास तरुणांना उद्योग-व्यवसायासाठी 15 लाख रुपये बिनव्याजी कर्ज देण्यात येईल, प्रधानमंत्री सुर्यघर अंतर्गत घरगुती वीज बिलात 30 टक्के कपात करण्यास राज्यात 25 लाख लखपती दिदी करण्यात येतील. असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महायुतीतील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ येथील थोरात चौकात आयोजित विजय निर्धार सभेत उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
फडणवीस म्हणाले, महाविकास आघाडीचे नेते व्होट जिहादची भाषा करणार्यांचे पाय चाटत आहेत. व्होट जिहादच्या माध्यमातून समाज तोडण्याचे काम केले जात आहे. आता आपण थांबलो तर उठु शकणार नाही. व्होट जिहाद लादू द्यायचा नसेल तर मतांचे धर्मयुद्ध करावेचं लागेल. हिंदूच्या अस्तित्वासाठीचे धर्मयुद्ध आहे आणि धर्मयुद्धात मतदानरुपी सहभागी होऊन विरोधकांचे नापाक इरादे गाडून रामराज्य आणूयात, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
🕣 8.30pm | 17-11-2024📍Ichalkaranji, Kolhapur | रा. ८.३० वा. | १७-११-२०२४📍इचलकरंजी, कोल्हापूर.
🪷BJP Jahir Sabha for Ichalkaranji BJP candidate Rahul Awade at Ichalkaranji, Kolhapur
🪷इचलकरंजी भाजपा उमेदवार राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ इचलकरंजी, कोल्हापूर येथे भाजपा जाहीर… pic.twitter.com/GzDi3jAsl3— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 17, 2024
महायुती सरकारने एससी, एसटी, आदिवासी, ओबीसी, भटका-विमुक्त समाज, दलितांसाठी विविध योजना काढल्या. त्यात शिष्यवृत्ती योजना, मोफत शिक्षण योजना, घरकुल योजना, बिरसा मुंडा योजना असे ओबीसी व भटक्या विमुक्तांसाठी एकूण 48 निर्णय महायुतीच्या सरकारने घेतले. महायुतीचे सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार असून, गती व प्रगतिशील सरकार आहे व महाविकास आघाडीचे सरकार स्थगिती देणारे सरकार आहे.
उलेमा कौन्सिलचे प्रमुख सज्जाद नोमानी हे व्होट जेहादचे आवाहन करीत आहेत. धर्माचा वापर करून शरद पवार, उद्धव ठाकरे व काँग्रेस व्होट जिहाद करीत आहेत. व्होट जिहादचे प्रमुख शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी आणि नाना पटोले आहेत. देशाच्या इतिहासात निवडणुकीत मते मिळविण्यासाठी इतके लांगूलचालनपणा आम्ही बघितला नाही. महाविकास आघाडीसमोर निवडणुकीसाठी मुद्देच उरले नसून ते समाजाला जाती-जातींमध्ये विभाजित करून धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न करत आहेत. जी बहुसंख्य मते आहेत. त्यांना पुनर्विचार करावा लागेल आणि एक व्हावे लागेल असे आवाहन त्यांनी केले.