सन्मानजनक जागा मिळाल्या नाही तर स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा. सर्वांनी एकदिलाने महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवावा, असे आवाहन हसन मुश्रीफ यांनी केले.
वारसा नौद करण्यास गट खुला करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्विकारताना शहापुर येथील तलाठी आणि कोतवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात रंगेहात सापडले.
आमदार आवाडे यांनी डवरी यांना बोलावून चौकशी केली असता त्यांना धड बोलताही येत नव्हते. ते मद्यधुंद अवस्थेतच कामावर असल्याचे समजल्यानंतर आवाडे यांनी दूरध्वनीवरुन थेट वरिष्ठांशी संपर्क साधला.
शिवाजीनगर पोलिसांनी भोनेमाळ आणि शेळके मळा जॅकवेल रोड याठिकाणच्या जुगार अड्ड्यावर छापे मारले आहेत. या कारवाईत ६ दुचाकी, ९ मोबाईल व जुगाराचे साहित्य असा ३ लाख २२ हजार ६८० रुपयांचा…
विक्री आणि वाहतूकीसाठी बंदी घातली असतानाही चारचाकीतून सुगंधी तंबाखुजन्य पदार्थ व गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या एकाला गावभाग पोलिसांनी अटक केली आहे.
कुत्रे भुंकल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून चाकूने वार केल्याने दोघेजण जखमी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना खोतवाडीतील आयोध्यानगर येथे घडली आहे.
घरातच १०० आणि ५०० रुपयांच्या बनावट नोटा छपाई प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने इचलकरंजीतील तीन तरुणांना अटक केली आहे. अधिक तपास पोलिसांकडून सुरु आहे.
कबनूर येथील रवी परीट यांच्या मालकीच्या खाेलीत बेकायदेशीरपणे विनपरवाना सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर शिवाजीनगर पाेलिसांनी छापा टाकला आहे. यामध्ये तीनपानी जुगार खेळणाऱ्या ९ जणांना ताब्यात घेतले आहे.
इचलकरंजीत जुगार अड्ड्यावर गावभाग पोलिसांनी छापा टाकला आहे. या कारवाईत १३ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, २ लाख ६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
हा प्रकार रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याची माहिती शहापूर पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन गणेशला उपचारासाठी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल केले.