Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“जो पवार साहेबांना फसवू शकतो तर, तो…”; समरजित घाटगेंची मुश्रीफांवर खोचक टिका

ज्यात लवकर विधानसभा निवडणूक होणार आहे. येत्या काही दिवसांमध्ये कोणत्याही क्षणी राज्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी आणि सत्ताधारी महायुती पुन्हा सत्तेत येण्यासाठी जोरदार तयारी करत आहे. प्रत्यक्ष प्रचारसभा आणि अन्य गोष्टी सुरू झाल्या नसल्या तरी देखील एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यास सुरूवात झाली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 07, 2024 | 02:35 AM
"जो पवार साहेबांना फसवू शकतो तर, तो..."; समरजित घाटगेंची मुश्रीफांवर खोचक टिका

"जो पवार साहेबांना फसवू शकतो तर, तो..."; समरजित घाटगेंची मुश्रीफांवर खोचक टिका

Follow Us
Close
Follow Us:

कोल्हापूर: राज्यात लवकर विधानसभा निवडणूक होणार आहे. येत्या काही दिवसांमध्ये कोणत्याही क्षणी राज्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी आणि सत्ताधारी महायुती पुन्हा सत्तेत येण्यासाठी जोरदार तयारी करत आहे. तसेच निवडणुकीसाठी अनेक इच्छुक देखील असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच प्रत्यक्ष प्रचारसभा आणि अन्य गोष्टी सुरू झाल्या नसल्या तरी देखील एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यास सुरूवात झाली आहे. दरम्यान कागलमध्ये समरजित घाटगे विरुद्ध हसन मुश्रीफ यांच्यात लढत होणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. मात्र अधिकृत घोषणा होणे अद्याप बाकी आहे.

कागलमधील लढाई हसन मुश्रीफ विरुद्ध समरर्जीतसिंह घाटगे अशी नसून धनशक्ती विरुद्ध स्वाभिमानी जनता यांच्यामध्ये आहे. या लढाईत ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांचे आशीर्वाद व स्वाभिमानी जनता यावेळी माझ्यासोबत आहे. पवारसाहेब यांच्यावर कागलच्या जनतेचे आजही प्रेम आहे. मात्र पालकमंत्री हसन मुश्रीफ यानी  स्वार्थापोटी,पवार साहेब यांचेवरील निष्ठेचा सौदा केला आहे. यावेळी हा सौदा  त्यांना खूप महागात पडणार आहे असा टोला  राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना लगावला आहे.

समरजित घाटगे पुढे म्हणाले, “स्व:स्वार्थापोटी पवारसाहेब याना अडचणीच्या वेळी सोडून  मुश्रीफ साहेब यांनी मोठा धोका दिलेला आहे.याची त्यांना मोजावी लागेल? कागल मतदारसंघांमध्ये निवडणुकीआधीच पैशाचा प्रचंड वापर  सुरू आहे. जनतेची किंमत पैशात केली जात आहे. येत्या निवडणुकीत  मोठ्या प्रमाणात पैसा वापरला जाणार आहे. विरोधकांना पर राज्यातून पैसा येत आहे.अशी चर्चा आहे.त्यावर माझी करडी नजर आहे. मोठ्या प्रमाणात विकास कामासाठी निधी आणला म्हणणा-या पालकमंत्र्यांना  इतर गटांची मदत घ्यावी लागते?.आमच्या कार्यकर्त्यांची फोडाफोडी का करावी लागते? मागील काही निवडणुकीत युवा पिढीला खोटे शब्द दिले.त्यामधे एका पिढीचे आयुष्य बरबाद झाले याला जबाबदार कोण? शाहू फुले आंबेडकरांचे नाव घेता तर मग  आजपर्यंत किती गंगाराम कांबळे घडवले?  याचा  कागल गडहिंग्लज उत्तुर  च्या जनतेने विचार करण्याची वेळ आली आहे.”

”माझ्यासह कुटुंबीयांवर  खालच्या पातळीवर जाऊन टीका होत आहे.  माझ्या संस्कारानुसार त्यांना त्या भाषेत उत्तर देणार नाही. कारण मी काय केलेलेच नाही. त्यामुळे कर नाही त्याला डर कशाची. त्यांचा सारखा गुरुच्या पाठीत खंजीर खुपसून निष्ठा विकून मी आलेलो नाही. त्यांना पाहिजे असेल तर मी माझ्या प्रॉपर्टीचे सर्व तपशील देतो.त्यांनी त्याची खुशाल तपासणी करावी. कारण त्यांच्यासारखे जमिनीचे व्यवहार करण्यासाठी मला पार्टनरची आवश्यकता भासत नाही. शेंडा पार्कातील अकराशे बेडच्या हॉस्पिटल व जिल्हा बँकेच्या मुख्य इमारतीच्या उद्घाटन साठी ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आणणार म्हणत होते. पण ते आले नाहीत. कारण शहा साहेबांनाही माहित आहे की जो माणूस सर्व काही दिलेल्या शरद पवार साहेबांना फसवू शकतो तर तो आमचा तरी कसा होईल?” असा सवाल समरजित घाटगे यांनी उपस्थित केला आहे.

Web Title: Samarjit ghatge criticizes on hasan mushrif in kagal kolhapur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2024 | 02:35 AM

Topics:  

  • Hasan Mushrif
  • Maharashtra Assembly election 2024

संबंधित बातम्या

कागलच्या राजकारणाला कलाटणी; मुश्रीफ-घाटगे युतीमुळे राजकीय समीकरणे बदलणार
1

कागलच्या राजकारणाला कलाटणी; मुश्रीफ-घाटगे युतीमुळे राजकीय समीकरणे बदलणार

“सन्मानजनक जागा मिळाल्या नाही तर…”: महायुती फुटणार? ‘या’ नेत्याच्या विधानाने खळबळ
2

“सन्मानजनक जागा मिळाल्या नाही तर…”: महायुती फुटणार? ‘या’ नेत्याच्या विधानाने खळबळ

जागांबाबत मित्रपक्षांशी चर्चा करा, सन्मानजनक जागा मिळाल्या नाहीत तर…; हसन मुश्रीफांचे कर्यकर्त्यांना आवाहन
3

जागांबाबत मित्रपक्षांशी चर्चा करा, सन्मानजनक जागा मिळाल्या नाहीत तर…; हसन मुश्रीफांचे कर्यकर्त्यांना आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.