नंदुरबारमधील रस्त्यांची अवस्था पाहून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. गुजरातमधून महाराष्ट्रात प्रवेश केल्यानंतर रस्त्यांची खराब अवस्था दिसल्याचे सांगत त्यांनी संबंधित विभागाला जाब विचारण्याचा इशारा दिला.
राज्यातील दूध भेसळविरोधी कारवाईनंतर कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या दुधाला ग्राहकांकडून मोठी पसंती मिळत असल्याचा दावा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, गोकुळ दूध संघाकडे दररोज सुमारे…
सांगली येथील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयातील ५०० बेडच्या अतिरिक्त इमारतीला नव्याने प्रशासकीय मान्यता देण्यासाठी पावसाळी अधिवेशनानंतर बैठक घेणार असल्याचे आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी पृथ्वीराज पाटील यांना दिले.
बोगस डॉक्टरांना रोखण्यासाठी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने 'नो युअर डॉक्टर' क्युआर कोड प्रणाली सुरू केली आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत १० वर्षांच्या शिक्षेची तरतूद जाहीर केली.
Hasan Mushrif वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पीपीपी तत्त्वावर राबविण्यात येणाऱ्या एमआरआय, सीटी स्कॅन आणि पीईटी सीटी स्कॅन प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेतला. रुग्णांना दर्जेदार व…
सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर सतत कुरघोड्या करत असल्याचे चित्र असतानाच आता सत्ताधाऱ्यांमधील मित्रपक्षातील नेतेच आता एकमेकांवर टीकाटिपण्ण्या करायला लागले आहेत. यावरूनच आता शिवसेना नेते आणि मंत्री संजय शिरसाट आणि राष्ट्रवादी…
तालुक्यात मंत्री हसन मुश्रीफ यांची मानकीवली या गावी स्वतःची अशी जमीन आहे.आता त्यांच्या सुपुत्राच्या नावावर देखील मोठी जमीन पोशिर गावी आढळून आली असून या मंत्री पुत्राने येथे चांगलेच पराक्रम गाजवले…
राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या बांधकामांना गती देण्याचे निर्देश हसन मुश्रीफ यांनी दिले. अलिबाग, नंदुरबार, गोंदिया, सातारा आणि सिंधुदुर्ग प्रकल्पांचा आढावा बैठकीत घेण्यात आला.
अजित पवार यांच्या अपघाती निधनाची योग्य सखोल चौकशी होणार आहे. त्याचबरोबर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का याबाबत फक्त अजित पवारांना माहिती होते असे हसन मुश्रीफ म्हणाले आहेत.
तालुक्यातील पाचही गट व दहा गणांमध्ये हाय व्होल्टेज लढती पाहायला मिळणार असून, आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असल्याने तहसील कार्यालय परिसरात मोठी गर्दी उसळली होती.
राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा मानला जाणाऱ्या कागल तालुक्यात एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे एकत्र आल्यानंतर भाजपाचे माजी आमदार संजय घाटगे यांच्या गटात अस्वस्थता पसरली होती.
लाडक्या बहिणींचे 1500 रुपयाचे असलेले अनुदान 2100 करतानाच संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ होण्यासाठी अडचणीच्या ठरत असलेल्या तांत्रिक बाबी लवकरच दूर होतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
सन्मानजनक जागा मिळाल्या नाही तर स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा. सर्वांनी एकदिलाने महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवावा, असे आवाहन हसन मुश्रीफ यांनी केले.