
प्रशासनाकडून आश्वासन
पाटण शहरातील इतर पूलही टप्प्याटप्याने पाडून रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेण्याचे ठरविण्यात आले. कामाच्या कालावधीत पर्यायी वाहतूक व्यवस्था करून नागरिकाना होणारा त्रास कमी करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. या निर्णयामुळे पाटण शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून कराड-चिपळूण महामार्गावरील प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि वेगवान होईल, असा विश्वास उपस्थित अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
तांत्रिक अडचणी
पाहणी दरम्यान अधिकारी, नागरिकांमध्ये सविस्तर चर्चा झाली. काहींनी पूल पूर्णपणे न पाडता एका बाजूने वाहतूक सुरू ठेवून दुसऱ्या बाजूने बांधकाम करण्याचा पर्याय सुचविला. मात्र या पर्यायावर तांत्रिक अडचणी असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
पूल पूर्णपणे पाडूनच नव्याने बांधकाम जलदगतीने सुरू करावे
रस्ते विकास महामंडळाचे अभियंता महेश पाटील यांनी सांगितले की, पुलाचे बांधकाम सुरू असताना एका बाजूने वाहतूक वळवल्यास कामात वारंवार अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कामाचा वेग कमी होऊन प्रकल्प पूर्ण होण्यास विलंब लागू शकतो. त्याचबरोबर सध्या वादळी पावसाची शक्यता लक्षात घेता वरच्या बाजूस पाऊस झाल्यास या पुलावरून दोन्ही बाजूंनी पाण्याचा प्रवाह वाढतो. अशा व पाइप वाहून जाण्याची वेळ येऊ ADVAN परिस्थितीत एका बाजूने वाहतूक सुरू ठेवली तर भराव व शकते. ज्यामुळे वाहतुकीत पुन्हा अडथळे निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी काम थांबण्याचीही शक्यता व्यक्त केली, त्यामुळे पूल पूर्णपणे पाडूनच नव्याने बांधकाम जलदगतीने, सुरक्षितपणे आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण होईल.