Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ललित पाटील प्रकरणात पोलीस, ससूनसह आता जेल प्रशासनाचीही भूमिका संशयास्पद; अधीक्षकांचे पत्र आले समोर

  • By युवराज भगत
Updated On: Nov 21, 2023 | 03:44 PM
ललित पाटील प्रकरणात पोलीस, ससूनसह आता जेल प्रशासनाचीही भूमिका संशयास्पद; अधीक्षकांचे पत्र आले समोर
Follow Us
Close
Follow Us:

Lalit Patil Case : ड्रग माफिया ललित पाटीलला १५ दिवस ससून रुग्णालयात ठेवून घेण्यासाठी दिलेले कारागृह अधीक्षकांचे पत्र आता समोर आले आहे. यामुळे ड्रग माफिया ललित पाटीलला मदत करण्यात येरवडा कारागृह प्रशासनसुद्धा सहभागी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. येरवडा कारागृहाच्या मुख्य वैद्यकीय आधिकाऱ्याचे पत्र आता समोर आले आहे. ३ जून २०२३ ला लिहलेले हे पत्र आहे. ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकांना उद्देशून हे पत्र लिहण्यात आले आहे.

ललितला ससूनमध्ये १५ दिवस ठेवले

या पत्रात येरवडा कारागृहाचे वैद्यकीय अधीक्षक ललित पाटीलला उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल करून घेण्याची आणि किमान १५ दिवस त्याला तिथेच ठेवण्याची विनंती केली आहे. ललित पाटीलला ससूनमधून कारागृहात नेण्यासाठी एस्कॉर्ट उपलब्ध नाही. त्यामुळे ललितला ससूनमध्ये १५ दिवस ठेवले जावे, असे या पत्रात नमूद केलेले आहे.

कारागृहातील अधिकारीसुद्धा त्याच्या ललितच्या पाठीशी

दरम्यान, या पत्रावरती मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यासह इतर काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सह्या आहेत. त्यामुळे ललित पाटीलला फक्त ससूनमधील डॉक्टर, पुणे पोलिस यांचीच नाही, तर कारागृहातील अधिकारीसुद्धा त्याच्या पाठीशी होते, असे या पत्रातून दिसून येत आहे. या पत्रामुळे येरवडा कारागृह संशयांच्या भोवऱ्यात अडकले आहे.

ललित पाटीलला ससूनमधून कारागृहात नेण्यासाठी एस्कॉर्ट उपलब्ध नाही त्यामुळे ललितला ससूनमध्ये १५ दिवस ठेवलं जावं असं या पत्रात नमूद केलेलं आहे. यानंतर तब्बल ४ महिने ललित पाटील ससूनमध्ये होता. त्यानंतर तो पसार झाला होता.

काही डॉक्टरांना निलंबित करण्यात आले

दरम्यान आता ससून रूग्णालयाचे प्रशासन यांच्यासोबतच काही पोलिसांनी देखील ललित पाटीलला मदत करत असल्याचे समोर आले होते, त्यानंतर आता हे पत्र समोर आले आहे. या प्रकरणी काही डॉक्टरांना निलंबित करण्यात आलं आहे, पोलिसांवर कारवाई होत आहे, यासंबधी चौकशी सुरू आहे. आता हे पत्र समोर आल्यानंतर येरवडा कारागृहाचा देखील काही हात आहे का हे पाहण्यासाठी एक चौकशी समिती गठीत करण्याची मागणी करण्यात येत आहे.

Web Title: Lalit patil case police sassoon and now the role of jail administration is also doubtful the superintendents letter came in front nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2023 | 03:44 PM

Topics:  

  • Lalit Patil case
  • Sassoon Hospital

संबंधित बातम्या

पुण्यातील ससून हॉस्पिटलध्ये रुग्णाची आत्महत्या; गच्चीवरून उडी मारुन संपवले जिवन
1

पुण्यातील ससून हॉस्पिटलध्ये रुग्णाची आत्महत्या; गच्चीवरून उडी मारुन संपवले जिवन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.