जळगाव : कोरोनाच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात औषध अधिक साहित्य यांची फार मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आली. ही खरेदी काही राज्य सरकार व स्थानिक विकास निधी आमदार व खासदार निधीतून करण्यात आली, या खरेदीची आवश्यकता होती. मात्र, घाई घाई मध्ये खरेदी करण्यात आली. परंतु या खरेदीच्या वेळी फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी केला आहे.
[read_also content=”‘ही आहे प्रधानमंत्री जन धन लूट योजना’, इंधन दरवाढीवरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर साधला निशाणा https://www.navarashtra.com/india/rahul-gandhi-criticized-prime-minister-narendra-modi-for-fuel-price-hike-nrsr-265060.html”]
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये विविध साहित्य आणि औषधांची खरेदी फार मोठ्या प्रमाणात झालेली आहे. या खरेदीमध्ये फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे .असा आरोप राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी जळगाव मध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना केले आहे.
[read_also content=”अमरावती – यवतमाळ मार्गावर बस व ट्रकच्या जबर धडकेत १ व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू तर, २४ जण गंभीर जखमी https://www.navarashtra.com/maharashtra/amravati-one-killed-24-injured-in-bus-truck-collision-on-yavatmal-road-nraa-265080.html”]