पंढरपूर : राज्याच्या राजकारणामध्ये (Political News) नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी राज्य सरकराला इशारा (State Govt) दिला आहे. सोशल मीडियावर त्यांनी व्हिडिओ शेअर करत राज्य सरकारला सुनावले आहे. पंढरपूरातील या व्हिडिओमुळे राजकारणामध्ये वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. विजय वडेट्टीवार यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पंढरपूरातील काही लोक महात्मा गांधींचे (Mahatma Gandhi) हत्यारा नथूराम गोडसेच्या (Nathuram Godse) नावाने घोषणाबाजी करत आहे. नथुराम गोडसेचं उदात्तीकरण खपवून घेतलं जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी राज्य सरकारला दिला.
विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पंढरपुरातील एक व्हिडिओ शेअर करत धक्कादायक दाबा केला आहे. या पोस्टमध्ये वडेट्टीवार म्हणाले, “राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या केलेल्या नथुराम गोडसेच्या समर्थनार्थ पंढरपुरात काही समाजकंठकांनी जयजयकाराच्या घोषणा देत पोस्टरबाजी केल्याचे समोर आले आहे. या समाजकंठकांवर सरकारने कठोर कारवाई करावी. महाराष्ट्राच्या मातीत नथुराम गोडसेचे उदात्तीकरण खपवून घेतले जाणार नाही.” असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारला दिला आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या केलेल्या नथुराम गोडसेच्या समर्थनार्थ पंढरपुरात काही समाजकंठकांनी जयजयकाराच्या घोषणा देत पोस्टरबाजी केल्याचे समोर आले आहे. या समाजकंठकांवर सरकारने कठोर कारवाई करावी. महाराष्ट्राच्या मातीत नथुराम गोडसेचे उदात्तीकरण खपवून घेतले जाणार नाही. pic.twitter.com/dbbnO0le6t
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) January 26, 2024
सध्याच्या राजकारणामध्ये विरोधक व सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार राजकीय वाद प्रतिवाद होताना दिसत आहेत. विरोधकांवर चालू असलेल्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. सत्तेचा वापर विरोधकांचा आवाज बंद करण्यासाठी केला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. तर राष्ट्रीय पातळीवरील विरोधकांच्या इंडिया आघाडीमध्ये निवडणूकीपूर्वीच बिघाडी झाल्यामुळे सत्ताधारअयांनी विरोधकांना धारेवर धरले आहे. ही आघाडी कधी नव्हतीच असे सत्ताधारी सुनावत आहेत. त्याचबरोब राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा देखील ऐरणीवर आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे लाखो समर्थकांसह मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. हायकोर्टाने देखील या प्रकरणामध्ये लक्ष घालून निर्देश दिल्यामुळे राज्य सरकारपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामध्ये आता पंढरपूरातील ही तरुणांची घोषणाबाजी करतानाचा व्हिडिओ समोर आल्यामुळे नवीन वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.