Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोखाड्यात बिबट्याच्या बछड्यांचा मुक्त विहार! नागरिक आणि विद्यार्थी दहशतीखाली

मोखाड्यातील पुलाचीवाडी येथे बिबट्याच्या बछड्यांचा मुक्त वावर दिसून आला असून, त्याचा व्हिडिओ शेतकऱ्याने टिपला आहे. या घटनेमुळे नागरिक आणि विद्यार्थी दहशतीखाली असून वनविभागाकडून तत्काळ कारवाईची मागणी होत आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 17, 2025 | 04:00 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

दीपक गायकवाड, मोखाडा: मोखाडा तालुक्यातील पुलाचीवाडी परिसरामध्ये सध्या बिबट्याचा आणि त्याच्या बछड्यांचा मुक्तपणे वावर दिसून येत आहे. नुकत्याच घडलेल्या एका घटनेमध्ये, शेतकरी विनायक दोधाड यांनी आपल्या घरातून मोबाईल कॅमेर्‍याच्या सहाय्याने दोन बिबट्याच्या बछड्यांचा व्हिडिओ कैद केला. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिक, शेतकरी आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

‘दिनो मोरियाने तोंड उघडलं तर अनेकांचा मोरया होईल’ : एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना इशारा

दि. १३ जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पुलाचीवाडी शिवारात दोन बिबट्याचे बछडे शेतात मुक्तपणे खेळताना दिसून आले. हा थरारक व्हिडीओ विनायक दोधाड यांनी आपल्या घरातूनच मोबाईलमध्ये टिपला. या व्हिडिओमुळे बिबट्यांचा वावर पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. मागील दीड महिन्यापासून या परिसरात बिबट्याचे दर्शन होत असल्याचे बोलले जात होते, परंतु या व्हिडिओने त्या संशयावर शिक्कामोर्तब केले आहे.

पुलाचीवाडी, पळसुंडे आणि निकमवाडी परिसरात घनदाट जंगल आणि झाडे-झुडपांनी व्यापलेला परिसर असल्यामुळे बिबट्यांसाठी हे अनुकूल ठिकाण आहे. पळसुंडे येथील आश्रमशाळेत शिकणारे विद्यार्थी रोज पायवाटेने, दाट झाडीतून चालत शाळेत ये-जा करतात. यामुळे त्यांच्या जीविताला मोठा धोका निर्माण झाला आहे. शेतकरी शेतात एकटेच काम करत असल्यामुळे त्यांनाही भीती वाटू लागली आहे.

विनायक दोधाड यांनी सांगितले की, “बिबट्याचे बछडे आमच्या घराजवळ खेळत असताना मी भीतीने व्हिडिओ काढला. बिबट्याने आधी आमच्या गावात कुत्रे, बकऱ्या, कोंबड्यांवर हल्ले केले आहेत. त्यामुळे नागरिक भयभीत आहेत. वनविभागाने तात्काळ उपाययोजना करावी.”

स्वच्छ सर्वेक्षण 2024’ मध्ये नवी मुंबईचं अव्वल स्थान; ‘सुपर स्वच्छ लीग’ मध्ये समाविष्ट महाराष्ट्रातील एकमेव शहर

परिसरातील नागरिकांनी वनविभागाकडे मागणी केली आहे की, बिबट्या व त्याच्या बछड्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, जेणेकरून विद्यार्थ्यांचे आणि नागरिकांचे जीव वाचू शकतील. वनविभागाने पिंजरे लावून बिबट्याला जेरबंद करणे ही काळाची गरज झाली आहे. ही घटना वन्यजीव संरक्षण आणि मानवी सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असून, लवकरात लवकर प्रभावी उपाययोजना न झाल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

Web Title: Leopard cubs roam freely in mokhada

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2025 | 04:00 PM

Topics:  

  • palghar

संबंधित बातम्या

पालघर जिल्ह्यातील ६२ प्राथमिक शाळा धोकादायक! २०२४ मध्ये निर्लेखनाचा आदेश पण कारवाई शुन्य
1

पालघर जिल्ह्यातील ६२ प्राथमिक शाळा धोकादायक! २०२४ मध्ये निर्लेखनाचा आदेश पण कारवाई शुन्य

जुने शालेय अभिलेख जिर्ण; पालघर जिल्ह्यात विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांसाठी त्रास
2

जुने शालेय अभिलेख जिर्ण; पालघर जिल्ह्यात विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांसाठी त्रास

मोखाडा तालुक्यात खड्ड्यांचा कहर! प्रवाशांचा जीव धोक्यात
3

मोखाडा तालुक्यात खड्ड्यांचा कहर! प्रवाशांचा जीव धोक्यात

वसई विरारमध्ये क्लस्टर डेव्हलपमेंट योजना लागू होणार, प्रताप सरनाईक यांचा निर्णय
4

वसई विरारमध्ये क्लस्टर डेव्हलपमेंट योजना लागू होणार, प्रताप सरनाईक यांचा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.