Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Palghar Zilla Parishad: सरावली ग्रामपंचायतीत आर्थिक गैरव्यवहार? अमोल गर्ने यांचा आंदोलनाचा इशारा

पालघर तालुक्यातील सरावली ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत, सामाजिक कार्यकर्ते अमोल गर्ने यांनी पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांची भेट घेतली

  • By Priti Hingane
Updated On: Feb 13, 2026 | 04:40 PM
Palghar Zilla Parishad: सरावली ग्रामपंचायतीत आर्थिक गैरव्यवहार? अमोल गर्ने यांचा आंदोलनाचा इशारा

Palghar Zilla Parishad: सरावली ग्रामपंचायतीत आर्थिक गैरव्यवहार? अमोल गर्ने यांचा आंदोलनाचा इशारा

Follow Us
Follow Us:

Palghar Zilla Parishad: सरावली ग्रामपंचायतीत आर्थिक गैरव्यवहार? अमोल गर्ने यांचा आंदोलनाचा इशारा

पालघर तालुक्यातील सरावली ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत, सामाजिक कार्यकर्ते अमोल गर्ने यांनी पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांची भेट घेतली. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात असल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, येत्या १८ फेब्रुवारीपर्यंत ठोस कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. अमोल गर्जे यांनी सादर केलेल्या निवेदनानुसार, सरावली ग्रामपंचायतीत रस्ते कामांमध्ये प्रशासकीय मंजुरी नसताना कामे करणे, सार्वजनिक निधीचा अपहार आणि निवृत्त ग्रामसेवकांच्या भूमिकेबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

Vasai Virar Illegal Construction: वसईत अनधिकृत बांधकामांवर कडक कारवाई; महापौरांचा आक्रमक इशारा

२ फेब्रुवारी रोजी यासंदर्भात तक्रार दाखल करूनही, गट विकास अधिकारी स्तरावर केवळ औपचारिक पत्रव्यवहार करून वेळ काढूपणा केला जात असल्याचा आरोप गर्जे ह्यांनी केला आहे. ग्रामसभेत ठराव होऊन आणि निधी उपलब्ध असूनही ‘आनंदी नगर रस्ता’, रेशन दुकान चाळ रस्ता’ आणि सौर दिवे बसवण्यासारखी महत्त्वाची विकासकामे रखडलेली आहेत. दुसरीकडे, कोणत्याही शासकीय मंजुरीशिवाय काही विशिष्ट भागात डांबरीकरणाची कामे सुरू असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले आहे. हा प्रकार लोकशाही प्रक्रियेचा अपमान असून यात मोठे आर्थिक संगनमत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अराजकता; रखडलेल्या कामामुळे नागरिकांमध्ये संताप उसळला

प्रशासनाने ६ दिवसांत लेखी उत्तर न दिल्यास आणि १८ फेब्रुवारीपर्यंत दोषींवर शिस्तभंग किंवा कायदेशीर कारवाई न केल्यास, गट विकास अधिकारी यांच्या दालनासमोर संबंधित कागदपत्रे फाडून ‘कागद फाडो’ निषेध आंदोलन करण्यात येईल, असा अंतिम इशारा गर्जे यांनी दिला आहे. अमोल गर्जे यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन या प्रकरणातील ‘जाणीवपूर्वक झालेला विलंब’ आणि ‘अपूर्ण चौकशी’ यावर मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांचे लक्ष वेधले. रानडे यांनी या प्रकरणाची दखल घेत त्वरित कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले असून सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Serious question mark over gram panchayat in palghar taluka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2026 | 04:40 PM

Topics:  

  • palghar
  • Zilla Parishad

संबंधित बातम्या

विमा कंपनी-ह्युंदाईच्या वादात कार मालकाचा खोळंबा; दीड महिन्यांपासून कार सर्व्हिस सेंटरमध्ये
1

विमा कंपनी-ह्युंदाईच्या वादात कार मालकाचा खोळंबा; दीड महिन्यांपासून कार सर्व्हिस सेंटरमध्ये

Vasai Building Collapse : अचानक भिंतींना तडे गेले अन्… वसईत ऐनपावसाळ्यात 23 कुटुंबे बेघर; महापालिकेकडून बांधकाम जमीनदोस्त
2

Vasai Building Collapse : अचानक भिंतींना तडे गेले अन्… वसईत ऐनपावसाळ्यात 23 कुटुंबे बेघर; महापालिकेकडून बांधकाम जमीनदोस्त

Vasai News: कॅनोसा स्कूलमध्ये ‘व्हिंटेज – सुवर्णयुगाची पुनर्भेट’; सामाजिक शास्त्र प्रदर्शन उत्साहात
3

Vasai News: कॅनोसा स्कूलमध्ये ‘व्हिंटेज – सुवर्णयुगाची पुनर्भेट’; सामाजिक शास्त्र प्रदर्शन उत्साहात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.