Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लोकसभा निवडणूक 2024; सुजय विखेंची मागणी मान्य; ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची होणार पडताळणी

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महायुतीतील भाजपचे उमेदवार सुजय विखे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार   पक्षाचे नीलेश लंके यांच्या चुरशीची लढत झाली. यात सुजय विखेंचा निवडणुकीत पराभव झाला. पण त्यानंत सुजय विखेंनी या निकालावर शंका घेत निवडणूक आयोगाकडे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट पडताळणीची मागणी केली होती

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jul 17, 2024 | 01:43 PM
लोकसभा निवडणूक 2024; सुजय विखेंची मागणी मान्य; ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची होणार पडताळणी
Follow Us
Close
Follow Us:

अहमदनगर : अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील पराभूत झाले. त्यांच्या पराभवानंतर सुजय विखेपाटील यांनी निवडणूक आयोगाकडे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट पडताळणीची मागणी केली होती.त्यांची ही मागणी आता निवडणूक आयोगाने मान्य केली आहे.

४ जूनला मतमोजणी पार पडल्यानंतर डॉ. सुजय विखे पाटील यांनी १० जूनला मतदारसंघातील ४० मतदान केंद्रावरील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची पडताळणी करण्यात यावी, यासाठी जिल्हा निवडणूक विभागाकडे अर्ज दाखल केला होता. त्यानंतर आता केंद्रीय निवडणूक आयोगाने जिल्हा निवडणूक विभागाला ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची पडताळणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे सुजय विखे यांच्या ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट पडताळणीत काय निष्कर्ष येतो, याचे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महायुतीतील भाजपचे उमेदवार सुजय विखे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार   पक्षाचे नीलेश लंके यांच्या चुरशीची लढत झाली. यात सुजय विखेंचा निवडणुकीत पराभव झाला. पण त्यानंत सुजय विखेंनी या निकालावर शंका घेत निवडणूक आयोगाकडे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट पडताळणीची मागणी केली होती. ही मागणी मान्य झाल्यानंतर आता मतदारसंघातील ४० मतदान केंद्रावरील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची पडताळणी करण्यात येणार आहे.

सुजय विखे यांनी मतदारसंघातील 40 मतदान केंद्रावरील ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनची पडताळणी करण्यासाठी जिल्हा निवडणूक विभागाकडे अर्ज केला. जिल्हा प्रशासनाने हा अर्ज राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवला. तिथून हा अर्ज केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आला. केंद्रीय निवडणूक आयोगाने या अर्जाची दखल घेत अहमदनगरच्या जिल्हा निवडणूक शाखेला मॉकपोल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. विशेष बाब म्हणजे या प्रक्रियेसाठी सुजय विखे यांनी निवडणूक आयोगाकडे सुमारे 19 लाख रुपयांचे शुल्क भरले आहे.

सर्वात आधी ईव्हीएम बनवलेल्या कंपनीचे अधिकारी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची तांत्रिक तपासणी करतील. विखेंनी आक्षेप घेतलेल्या 40 मशीची मेमरी रिकामी केली जाईल. त्यानंतर मतमोजणी कक्षात पेपर स्लीप (व्हीव्हीपॅट) आणि ईव्हीएम मशीनवरील मतांची पडताळणी केली जाईल. एका मशीनमध्ये प्रत्येकी 1 ते 1400 मते टाकता येतील. ही सर्व प्रक्रिया कॅमेराच्या राबवली जाणार आहे.

Web Title: Lok sabha election 2024 sujay vikhes demand accepted verification of evm and vvpat will be done

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2024 | 01:43 PM

Topics:  

  • Nilesh Lanke
  • Sujay Vikhe-Patil

संबंधित बातम्या

तिकोना किल्ल्यावर पार पडली गडकिल्ले संवर्धन मोहिम; खासदार निलेश लंकेंचा पुढाकार
1

तिकोना किल्ल्यावर पार पडली गडकिल्ले संवर्धन मोहिम; खासदार निलेश लंकेंचा पुढाकार

Nilesh Lanke : फक्त दोन मंत्र्यांचे कांड उघड जनतेच्या नव्हे ‘जुगाराच्या’ जोरावर सत्तेत
2

Nilesh Lanke : फक्त दोन मंत्र्यांचे कांड उघड जनतेच्या नव्हे ‘जुगाराच्या’ जोरावर सत्तेत

“साहेबांना माझ्या काही गोष्टी पटत नाहीत…”;  पुण्यातील कार्यक्रमात निलेश लंकेंचे मोठे विधान
3

“साहेबांना माझ्या काही गोष्टी पटत नाहीत…”; पुण्यातील कार्यक्रमात निलेश लंकेंचे मोठे विधान

Ahilyanagar : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबाबत श्रेयवाद; नेमकं प्रकरण काय, पाहा व्हिडीओ
4

Ahilyanagar : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबाबत श्रेयवाद; नेमकं प्रकरण काय, पाहा व्हिडीओ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.