Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

माण पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा, विक्रम शिंगाडे सभापती तर उपसभापतीपदी प्रियांका जगदाळे यांची निवड

माण पंचायत समितीच्या सभापतीपदी विक्रम शिंगाडे तर उपसभापतीपदी प्रियांका जगदाळे यांची निवड झाली आहे. समसमान मतांमुळे चिठ्ठीद्वारे राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी विजय मिळवला.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 16, 2026 | 09:39 PM
माण पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा

माण पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा

Follow Us
Close
Follow Us:

 

  • माण पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा
  • विक्रम शिंगाडे सभापती तर उपसभापतीपदी प्रियांका जगदाळे यांची निवड
दहिवडी, नवराष्ट्र, न्युज नेटवर्क : माण पंचायत समिती सभापती, उपसभापती पदाच्या निवडी आज माण पंचायत समितीच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विकास अहिर, गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे यांच्या उपस्थितीत पार पडल्या. चिट्ठीद्वारे सभापतीपदी राष्ट्रवादी पक्षाचे विक्रम शिंगाडे तर उपसभापतीपदी सौ. प्रियांका जगदाळे यांची निवड झाली.

सभापती पदासाठी राष्ट्रवादीमधुन विक्रम शिंगाडे तर भाजप मधुन अर्जुन काळे तर उपसभापती पदासाठी राष्ट्रवादी मधुन प्रियांका जगदाळे व भाजप मधुन डॉ. राजेंद्र खाडे यांनी अर्ज दाखल केला होता. निवडी साठी दोन दोन अर्ज प्राप्त झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यावतीने निवडीसाठी मतदान घेण्यात आले, विक्रम शिंगाडे व प्रियांका जगदाळे यांना कल्पना विरकर, गौरी तुपे, विद्या काटकर यांनी मतदान केले. तर अर्जुन काळे व डॉ. राजेंद्र खाडे यांच्याबाजूने बाळकृष्ण कदम, उषा भोसले, राजाराम बोराटे यांनी मतदान केले.

“महाराष्ट्रात 80 टक्के पाऊस होईल, असे गृहीत…”; ‘पाणी फाउंडेशन’च्या बैठकीत काय म्हणाले Devendra Fadnavis?

यामध्ये दोन्ही उमेदवारांना समसमान मते मिळाल्याने पुढील निवड प्रक्रिया चिठ्ठीद्वारे करण्यात आल्या. यामध्ये दोन्ही चिठ्ठया राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवारांच्या निघाल्याने माण पंचायत समितीवर अडीच वर्षासाठी झेंडा फडकला असल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडी नंतर राष्ट्रवादी पक्षाचे जेष्ठ नेते माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, अभय जगताप, मनोज पोळ, श्रीराम पोळ, दिलीप तुपे आदींनी नवनिर्वाचितांचे अभिनंदन केले.

चिठ्ठीचा कौल अनिल देसाईंच्या बाजूने

2007 व 2012 च्या निवडणुकीत व निवडीत अनिल देसाई यांच्या बाजूने चिठ्ठीने कौल दिला होता तर आजच्या ही निवडीत अनिल देसाई यांच्या गटाच्या बाजूने चिठठीने कौल दिला असल्याचे पाहायला मिळाले.

Ahilyanagar News: पोहण्यास गेलेला युवक दोन दिवसांनंतरही बेपत्ताच, संतप्त नातेवाईक महिलांच्या पाण्यात उड्या

Web Title: Maan panchayat samiti election vikram shingade priyanka jagdale winner

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 09:39 PM

Topics:  

  • Rashtrawadi Congress

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.