Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024: राज्यात तीन दिवसांमध्ये दाखल झाले 552 उमेदवारांचे 720 नामनिर्देशन पत्र

राज्यातील विधानसभेकरिता दोन दिवसांपासून उमेदवारांनी अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. आज अनेक मातब्बर नेत्यांनीही अर्ज भरले आहे. राज्यात आजपर्यंत 552 उमेदवारांचे 720 नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत.

  • By नारायण परब
Updated On: Oct 24, 2024 | 11:12 PM
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024: राज्यात तीन दिवसांमध्ये दाखल झाले 552 उमेदवारांचे 720 नामनिर्देशन पत्र
Follow Us
Close
Follow Us:

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या  उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल करणे 22 ऑक्टोबरपासून सुरु झाले आहे.  288 मतदारसंघात निवडणुकीकरिता नामनिर्देशन पत्र भरण्याचा आज तिसरा दिवस होता. 24 ऑक्टोबर 2024 रोजी म्हणजे आजपर्यंत 552 उमेदवारांचे 720 नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. आज अनेक मातब्बर नेते मंडळींनी राज्यात अर्ज भरले आहेत. 

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची 15 ऑक्टोबर 2024 रोजी घोषणा करण्यात आली. त्यानंतर राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. मंगळवार 22 ऑक्टोबर 2024 पासून  नामनिर्देशन पत्र भरणे सुरु असून 29 ऑक्टोबरला नामनिर्देशन पत्र भरण्याची शेवटची तारीख आहे. या अर्जाची 30 ऑक्टोबरला छाननी करण्यात येऊन 4 नोव्हेंबर 2024 रोजी उमेदवाराला अर्ज मागे घेता येऊ शकतो. राज्यातील  मतदान एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबरला पार पडणार आहे. 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी होणार आहे.

हे देखील वाचा- ऐन निवडणुकीत सापडलं कोट्यवधींचं घबाड; तब्बल 52 कोटींचा मुद्देमाल जप्त

ईव्हीएम मशिन्स बदलही देण्यात आली माहिती.

15 ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या विधानसभेची घोषणा केली. त्या दिवसापासून राज्यात आचारसंहिता ही लागू झाली. मंगळवार 22 ऑक्टोबर 2024 पासून उमेदवारी अर्ज भरण्याचा कालावधी सुरु झाला आहे. आज असंख्य उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज भरण्याची कालावधी ही 29 ऑक्टोबरपर्यंत आहे.  दरम्यान विधानसभा निवडणूकीच्या दृष्टीने राज्यात पूरेशा ईव्हीएम मशिन्स उपलब्ध आहेत अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आलेल्या माहितीमध्ये असे म्हटले आहे की,   “महाराष्ट्राच्या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी पुरेशा संख्येने ईव्हीएम मशिन्स उपलब्ध आहेत. सर्व बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व ईव्हीएम मशिन्सची प्रथम सरमिसळ 18 ते 21 ऑक्टोबर, 2024 या कालावधीत सर्व जिल्ह्यांकडून पूर्ण करण्यात आली आहे.

हे देखील वाचा-कॉंग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; कोणाला मिळाली संधी, कोणाला दिला डच्चू? वाचा सविस्तर

मतदान केंद्र ईव्हीएम मशिन्स

महाराष्ट्रातील  विधानसभा 2024 च्या निवडणुकीच्या अनुषंगाने 1 लाख 186 इतके मतदान केंद्र आहेत. या केंद्राकरिता 2 लाख 21 हजार 600 बॅलेट युनिट (221 %) 1 लाख 21 हजार 886 कंट्रोल युनिट (122%) व 1 लाख 32 हजार 94 व्हीव्हीपॅट (132%) इतक्या प्रथमस्तरीय तपासणी मशिन्स उपलब्ध आहेत. एकूण प्रथमस्तरीय करण्यात आलेल्या ईव्हीएम मशिन्स पैकी प्रशिक्षण व जनजागृतीच्या कार्यक्रमाकरिता त्यापैकी 5 हजार 166 बॅलेट युनिट, 5 हजार 166 कंट्रोल युनिट व 5 हजार 165 व्हीव्हीपॅट इतक्या ईव्हीएम मशिन्सचा वापर करण्यात आला आहे.

 

Web Title: Maharashtra assembly election 2024 720 nomination papers of 552 candidates filed across the state in just two days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2024 | 11:12 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: मोठी बातमी! हायकोर्टाचे मुख्यमंत्री फडणवीसांना समन्स; नेमके प्रकरण काय?
1

Devendra Fadnavis: मोठी बातमी! हायकोर्टाचे मुख्यमंत्री फडणवीसांना समन्स; नेमके प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.