महिलांनो, लाडकी बहीण योजनेतून पैसे घेताय? तर 'ही' बातमी महत्त्वाची, सरकार 15 कोटी रुपये घेणार परत
मुंबई : महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार उघडकीस आला आहे. ही योजना केवळ गरजू आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत महिलांसाठी आहे, तरीही हजारो सरकारी कर्मचाऱ्यांनी त्याचा फायदा घेतला आहे, ही धक्कादायक बाब आहे. त्यामुळे आता शासन स्तरावर याची पुनर्पडताळणी केली जात आहे.
सध्या अशा लाभार्थ्यांची, सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या 8000 पेक्षा जास्त झाली आहे आणि सरकारने त्या सर्वांकडून पैसे वसूल करण्यासाठी पावले उचलली आहेत. वित्त विभागाने संबंधित विभागांना कर्मचाऱ्यांच्या पगारातून अंदाजे 15 कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. लाडकी बहीण योजनेचा फायदा 2.5 लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या महिलांना होती. सरकारी कर्मचारी किंवा निवृत्त कर्मचारी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र नाहीत. तरीही, अनेक कर्मचाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन करून सरकारची फसवणूक केली. महिला आणि बाल कल्याण विभागाने माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या मदतीने अशा कर्मचाऱ्यांची यादी तयार केली आहे.
हेदेखील वाचा : लाडक्या बहिणींनो, e-KYC बंधनकारक असली तरी काळजी करू नका; ‘या’ स्टेप्स् फॉलो करा अन् KYC करून घ्या
यातील महत्त्वाची बाब म्हणजे, केवळ सक्रिय कर्मचारीच नाही तर निवृत्त कर्मचाऱ्यांनाही ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ मिळत आहे. त्यामुळे महिला आणि बाल कल्याण लाभार्थ्यांची यादी संबंधित विभागांना पाठवेल आणि पेन्शन विभागालाही पत्राद्वारे कळवले जाईल, अशी माहिती समोर आली आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीर केली योजना
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी ‘लाडकी बहीण’ योजना जाहीर करण्यात आली होती. त्यासाठी 3600 कोटींची तरतूद करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत बनावट लाभार्थी आढळल्यानंतर सरकारने सखोल चौकशी सुरू केली आहे. यामुळे, ही योजना खरोखर गरजू महिलांपर्यंतच पोहोचावी यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. यामध्ये जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक आणि इतर विविध विभागातील महिला कर्मचारी तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ही रक्कम या कर्मचाऱ्यांचा पगार किंवा पेन्शनमधून हप्त्यांमध्ये किंवा एकरकमी वसूल केली जाणार आहे.
हेदेखील वाचा : Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो काळजी घ्या…! E-KYC मधील एक चूक पडू शकते महागात, थेट नाव होईल कमी